...तर जिल्ह्यातील १२८२ गावांत सुरू होऊ शकतात शाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:10 AM2021-06-29T04:10:01+5:302021-06-29T04:10:01+5:30
कोरोनामुक्त, शिक्षण विभागाच्या १४ जूनच्या आदेशामुळे शक्यता कमी अमरावती : कोरोनामुक्त असलेल्या आणि पुढेही पूर्ण मुक्त राखण्याची खात्री देणाऱ्या ...
कोरोनामुक्त, शिक्षण विभागाच्या १४ जूनच्या आदेशामुळे शक्यता कमी
अमरावती : कोरोनामुक्त असलेल्या आणि पुढेही पूर्ण मुक्त राखण्याची खात्री देणाऱ्या गावांतील शाळा सुरू करण्याची शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात २८ जूनच्या माहितीनुसार, १६८७ गावांपैकी १२८२ गावे कोरोनामुक्त असून, शिक्षण विभागांची तयारी असल्यास त्यातील बहुतांश गावांमध्ये पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू होऊ शकतात. गत काही महिन्यांपासून जी गावे कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावांमधील इयत्ता दहावी, बारावीचे वर्ग सुरू करता येतील का, याची शक्यता विभागाने तपासून पाहावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाली. जिल्ह्यातील १२८२ गावे आरोग्य विभागाच्या अहवालानुसार कोरोनामुक्त आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार यातील जी गावे मागील काही महिन्यांपासून पूर्ण मुक्त आहेत आणि भविष्यात ही गावे कोरोनामुक्त ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांचे कडक पालन करीत गावे कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावात शाळा सुरू करण्यासाठी पडताळणी होऊ शकते. परंतु, राज्य शासनाच्या नव्या आदेशामुळे जिल्ह्यातही सोमवारपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले असून, यात शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.
बाॅक्स
तालुकानिहाय कोराेना मुक्त गावे
अमरावती -७८
भातकुली - ६८
मोशी -७६
वरूड - ८९
अंजनगाव सुर्जी - ८६
अचलपूर - ११२
चांदूर रेल्वे - ६३
चांदूर बाजार - ७४
चिखलदरा - १४४
धारणी - १५४
दर्यापूर - ८६
धामणगाव रेल्वे - ७८
तिवसा - ७२
नांदगाव खंडेश्वर - १०२
बॉक्स
जिल्ह्यातील एकूण शाळा - २८९८
जिल्हा परिषद शाळा - १५८३
अनुदानित - ७७९
विनाअनुदानित - ७४४
बॉक़्स
काेणत्या वर्गात किती विद्यार्थी?
पहिली - ३८७१५
दुसरी - ४०२७०
तिसरी - ४३८०१
चौथी - ४५२०३
पाचवी - ४४०३३
सहावी - ४४७२७
सातवी - ४४३१८
आठवी - ४४७४३
नववी-४४०५४
दहावी - ४६१९६
अकरावी - ३१३५३
बारावी - ३३९१५
कोट
शिक्षण संचालकांच्या १४ जून रोजीच्या पत्रानुसार शाळा सुरू झालेल्या आहेत. त्यानुसार ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. शाळा सुरू करण्याबाबत वरिष्ठांच्या सूचनेनुसार कारवाई केली जाईल.
- तेजराव काळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)