...तर पेट्रोलपेक्षाही महाग होईल पाणी; ३५० फुटांपर्यंतही थांग लागेना ना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:15 AM2021-07-14T04:15:53+5:302021-07-14T04:15:53+5:30

शहराला दिवसाआड पाणीपुरवठा, महापालिका नाेंदी ४,३०० बोअरवेलची संख्या, अनधिकृत बोअरवेलचा सुळसुळाट अमरावती : अमरावती, बडनेरा शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्धारे ...

... then water will be more expensive than petrol; Not even up to 350 feet! | ...तर पेट्रोलपेक्षाही महाग होईल पाणी; ३५० फुटांपर्यंतही थांग लागेना ना!

...तर पेट्रोलपेक्षाही महाग होईल पाणी; ३५० फुटांपर्यंतही थांग लागेना ना!

Next

शहराला दिवसाआड पाणीपुरवठा, महापालिका नाेंदी ४,३०० बोअरवेलची संख्या, अनधिकृत बोअरवेलचा सुळसुळाट

अमरावती : अमरावती, बडनेरा शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्धारे दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. दुसरीकडे अनधिकृत बोअरवेलची संख्या बेसुमार वाढत आहे. कोण, किती फूट बोअरवेल खोदते, याचे मापदंड नाही. येथील साईनगर, कॅम्प भागात ३५० फुटांपर्यंत बोअरवेलला पाणी लागत नसल्याची माहिती आहे. पाणी वापराचे नियोजन नसल्याने भविष्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागेल, यात दुमत नाही.

हल्ली पावसाळा असल्याने पाण्याची टंचाई जाणवत नाही. मात्र, काही घरांमध्ये जीवन प्राधिकरणच्या परवानगीशिवाय बोअरवेल खोदण्यात आले आहे. विशेषत: नव्या नागरी वस्त्यांमध्ये बोअरवेल खोदल्याशिवाय घर अथवा सदनिकांचे बांधकाम सुरू करण्यात येत नाही. बोअरवेल खोदण्याची अधिकृत परवानगी घेण्यात येत नाही. त्यामुळे मर्जीनुसार जमिनीत पाणी लागेपर्यंत बोअरवेल खोदल्या जाते. २०० फुटांच्यावर बोअरवेल खोदायचे असेल तरच घरापर्यत खोदणारी मशीन येते, असा शिरस्ता झाला आहे. महापालिका प्रशासनाने अनधिकृत बोअरवेलची शोधमाेहिम हाती घेतल्यास अनेक घरे, सदनिका, बंगल्यांमध्ये खोदल्या असल्याचे वास्तव समाेर येईल. हल्ली राजरोसपणे बोअरवेल खोदले जात असून, भविष्यात जमिनीत पाण्याची पातळी अधिक खोल जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. अमरावती महानगरात २४ जलकुंभावरून पाणीपुरवठा होत असल्याची माहिती आहे.

------------------

दिवसाला शहरात नळाद्धारे पाणीपुरवठा: ९५ हजार ग्राहक

शहरात एकूण बोअरवेल : ४३००

शहराची एकूण लोकसंख्या : ८.५० लाख

प्रतिव्यक्ती मिळते पाणी: १३५ लिटर

------------------

कंवरनगर, दस्तुरनगर सर्वाधिक बोअरवेल, पाणी सर्वात कमी

१) कंवरनगर, दस्तुरनगर भागात मजीप्राच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही, अशी रहिवासी नागरिकांची ओरड आहे.

२) अंबागेट, बुधवारा, साबणपुरा, औरगंपुरा, जवाहरगेटच्या आतील भागात जलवाहिनी ३० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही.

३) कंवरनगर, दस्तुरनगर भागात अधिक संख्येने बोअरवेल आहे. त्यामुळे पाणी कमी मिळते. जलकुंभापासून हा भाग लांब असल्याने पाणी मिळत नाही.

------------------

बडनेरा, महादेवखोरी, व्हीएमव्ही भागात जास्त पाणी

- जीवन प्राधिकरणाच्या जलकुंभ असलेल्या भागात जास्त पाणी मिळते. यात बडनेरा, महादेवखोरी, व्हीएमव्ही, साईनगर आदी भागात जास्त पाणीपुरवठा होतो.

-शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत असला तरी वडाळी, नागपुरी, नवसारी, पॅराडाईज कॉलनी, मायानगर भागात पुरेसा पाणीपुरवठा होतो.

----------------

कोणीही यावे, बोअरवेल खोदावे

- शहरातील नव्या कॉलनी, वस्त्यांमध्ये बोअरवेल खोदण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. आपल्या मर्जीप्रमाणे बोअरवेल खोदले जाते. साईंनगर, कॅम्प भागात ३५० फुटांच्यावर बोअरवेल खोदले जात आहे.

- राज्य शासनाने २५ मे २०१९ रोजी बोअरवेल खोदण्याबाबत नागरिकांकडून मते मागविली होती. मात्र, नियमबाह्य बोअरवेल खोदण्याचा प्रताप सुरूच आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्याने पाणी कमी मिळते. परिणामी नियमबाह्य बोअरवेल खोदून पाणी उपसण्याची शक्कल लढविली जात आहे.

--------------

जलपुनर्भरण नावालाच

‘‘ महापालिकेत नव्या बांधकामाला परवानगी देतावेळी मंजूर नकाशात जलपुनर्भरण प्रणाली असणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे १० हजार रूपये अनामत रक्कम जमा करण्यात येते. मात्र, हे जलपुनर्भरण नावालाच ठरते. बांधकामानंतर अभियंता घटनास्थळी जाऊन जलपुनर्भरणबाबतची पाहणी करीत नाही.

- किशोर शेळके, अमरावती.

-------------

‘‘ अवेळी पाऊस येणे ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने जलपुनर्भरण व्यवस्था उभारणे ही काळाची गरज झाली आहे. सिमेंटच्या जंगलामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नसून, ते वाहून जाते. जमिनीत पाणीसाठा कमी हाेत चालला आहे. याकरिता ठोस उपाययोजना व्हाव्यात.

- रमेश जाधव, अमरावती.

Web Title: ... then water will be more expensive than petrol; Not even up to 350 feet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.