विद्युत प्रवाहाने १४ जनावरे दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 10:03 PM2018-06-02T22:03:46+5:302018-06-02T22:03:59+5:30

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर परिसरात १०, तर दर्यापूर तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात चार जनावरे विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने २४ तासांत दगावली. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या परिणामी वरूड तालुक्यात लाखोंचे नुकसान झाले. याशिवाय उमरी मंदिर येथे आठ ते दहा घरांची पडझड झाली.

There are 14 animals in the river | विद्युत प्रवाहाने १४ जनावरे दगावली

विद्युत प्रवाहाने १४ जनावरे दगावली

Next
ठळक मुद्देवादळी पावसाचा फटका : शिरपूर येथे १० जनावरांचा मृत्यू; येवदा, सावंगीतही थैमान

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर/येवदा/सावंगी जिचकार : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर परिसरात १०, तर दर्यापूर तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात चार जनावरे विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने २४ तासांत दगावली. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या परिणामी वरूड तालुक्यात लाखोंचे नुकसान झाले. याशिवाय उमरी मंदिर येथे आठ ते दहा घरांची पडझड झाली.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर येथे शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे गावठाण फीडरच्या उच्चदाब वाहिनीचे फेज तार गुंतल्याने शाॉर्ट सर्कीट झाले. त्यामुळे वीज प्रवाह खांब तसेच तणावाच्या तारांमधून ओल्या जमिनीत संचारला. यावेळी शिवारात आसपास चरत असलेल्या १० गाई वीजप्रवाहाच्या संपर्कात आल्याने दगावल्या. यामध्ये विश्वेश्वर पुसदकर, किसनराव पुसदकर, महेंद्र चव्हाण, दिगंबर उके, मनोहर ढोरे, माया सोनोने, दामोजी सोनोने, निवृत्ती सोनोने यांची प्रत्येकी एक, तर मुकुंदराव बर्डे यांच्या दोन गाई आहेत. गुराखी उकंडराव बर्डे यांनी प्रसंगावधान राखून आपला जीव वाचविला. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विलास शिंदे, कनिष्ठ अभियंता प्रतीक ढवळे यांच्या उपस्थितीत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
येवद्यातही पावसाचा कहर
येवदा परिसरातील पिंपळखुटा शिवारात शुक्रवारी सायंकाळी ४ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी प्रवीण ढोरे यांच्या शेतातील झाड विद्युत तारेवर पडले. जमिनीवर आलेल्या विद्युत तारांचा विनोद कराड, दिलीप काळे यांच्या गार्इंना स्पर्श झाल्यामुळे त्या ठार झाल्या. मालाबाई टापरे यांच्या दोन बकऱ्याही दगावल्या. तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी पंचनामा केला. लगतच्या उमरी मंदिर येथील आठ ते दहा घरांची पडझड झाली असून, गावकºयांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीचा हात मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी केली आहे.
सावंगी परिसरात थैमान
वरूड तालुक्यातील सावंगी (जिचकार) सह गणेशपूर,जामठी, एकलविहीर परिसरात वादळी पावसाने शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास थैमान घातले. यामुळे सावंगी गावातील घरावरील छप्पर, टिन, कौल उडाले, तर घरेसुद्धा कोलमडून पडली. तर शेखर वानखडे यांच्या घराचे छत उडाल्याने साठवून ठेवलेला चणा पाण्याने पूर्णत: खराब झाला. शंकर शेळके यांच्या घरासह अनेकांचे घरांचे छत उडाले. किशोर बूब यांच्या शेतातील गोठ्यावर वीज कोसळल्याने कडबा, कुटार तसेच कृषिअवजारे भस्मसात झाली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. गावातील घराची पडझड आणि छप्पर उडाल्याने अनेकांना बेघर होण्याची वेळ आली. झाडेसुद्धा उन्मळून पडली. यामुळे काही काळ वाहतूक बंद पडली असल्याचे सांगण्यात येते. गणेशपूर, जामठी, एकलविहीर परिसरातसुद्धा मोठया प्रमाणात नुकसान झाले.

Web Title: There are 14 animals in the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.