अद्याप १.८७ लाख पोते यार्डात

By admin | Published: May 19, 2017 12:39 AM2017-05-19T00:39:54+5:302017-05-19T00:39:54+5:30

सद्यस्थितीत जिल्ह्यात नाफेडव्दारा ११ केंद्रांवर तुरीची शासकीय खरेदी सुरू असली तरी बाजार समितींच्या मार्केट यार्डात

There are still 1.87 lakh grandchildren in the yard | अद्याप १.८७ लाख पोते यार्डात

अद्याप १.८७ लाख पोते यार्डात

Next

नाफेड केंद्रांची स्थिती : जिल्ह्यात ११ केंद्रांवर तूर खरेदी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सद्यस्थितीत जिल्ह्यात नाफेडव्दारा ११ केंद्रांवर तुरीची शासकीय खरेदी सुरू असली तरी बाजार समितींच्या मार्केट यार्डात एक लाख ८७ हजार पोते तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. आतापर्यंत नाफेडव्दारा दोन हजार २६६ शेतकऱ्यांची ४२ हजार १५१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.
शासनाने तूर खरेदीचा निर्णय घेतल्यानंतर १० मे पासून आज तारखेपर्यंत बाजार समितींमध्ये दोन लाख ५१ हजार ४५३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली, तर १० हजार ४५० शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले आहेत. १७ मे रोजी ७७७ शेतकऱ्यांची १३ हजार ६९९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये चांदूररेल्वे केंद्रावर ४७ शेतकऱ्यांची ८५०.९७ क्विंटल, नांदगाव खंडेश्वर केंद्रावर २९ शेतकऱ्यांची ५७९.८७, मोर्शी केंद्रावर १८ शेतकऱ्यांची २९६.६१, अमरावती केंद्रावर एक शेतकऱ्याची २८.२८, धामणगाव केंद्रावर १६० शेतकऱ्याची १७००, अंजनगाव केंद्रावर ११४ शेतकऱ्यांची १९८८, चांदूरबाजार केंद्रावर ७६ शेतकऱ्यांची, दर्यापूर केंद्रावर ५४ शेतकऱ्यांची १२५७.११, वरुड केंद्रावर ११२ शेतकऱ्यांची, १८४० व नव्याने सुरू करण्यात आलेल्या तिवसा केंद्रावर १२ शेतकऱ्यांची १९०.४० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.
या केंद्रावर एकूण १० हजार ४५० शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले आहेत. यामध्ये चांदूररेल्वे ५८४, नांदगाव १ हजार ४३, मोर्शी ८१५, अमरावती १ हजार ७२९ धामणगाव रेल्वे ८६३, अचलपूर १ हजार २५३, अंजनगाव सुर्जी १ हजार २५७, चांदूरबाजार ६३१, दर्यापूर १ हजार ६२, वरुड १ हजार १८० व धारणी तालुक्यात ३३ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांना तूर खरेदीच्या आदल्या दिवशी यंत्रणांवर फोन करून खरेदीची माहिती दिली जात आहे.

अमरावती तालुक्यात ४५ हजार पोते पडून
जिल्ह्यात सद्यस्थितीत १.८७ लाख पोते तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये सर्वाधिक ४५ हजार पोते अमरावती बाजार समितीत आहे. अचलपूर २२ हजार, अंजनगाव सुर्जी १७ हजार, चांदूरबाजार ८ हजार, चांदूररेल्वे ८ हजार, दर्यापूर २५ हजार, धामणगाव रेल्वे २५ हजार, मोर्शी १७ हजार, नांदगाव खंडेश्र्वर ८ हजार, तिवसा २ हजार व वरुड तालुक्यात अंदाजे १० हजार पोते यार्डात पडून आहेत.
मुदतवाढीच्या निर्णयानंतर ४२ हजार क्विंटल खरेदी
केंद्रांना ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्यानंतर नाफेडव्दारा २,२६६ शेतकऱ्यांची ४२,१५०.३० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये चांदूररेल्वे ३,१६८ क्विंटल, नांदगाव २,९५७, मोर्शी ५९३, अमरावती २८, धामणगाव ४,१६६, अचलपूर ६,७०५, अंजनगाव सुर्जी ३,५५०, चांदूरबाजार १०,१८६, दर्यापूर २,७७०, वरुड ७,८३० व तिवसा केंद्रावर १९३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

 

Web Title: There are still 1.87 lakh grandchildren in the yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.