धारणीत अग्निशमनवाहनच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:57 PM2019-05-21T23:57:17+5:302019-05-21T23:57:39+5:30

सन २०१३ नंतर सहा वर्षांनी पुन्हा एकदा भुलोरी गावाने अग्निप्रलय अनुभवला. सहा वर्षांपूर्वीचे कटू अनुभव बाजूला सारत आदिवासी बांधवांनी नवा आशियाना उभारला. मात्र, आज पुन्हा तो आशियाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. कदाचित धारणी मुख्यालयी अग्निशमन यंत्रणा असती, तर झालेले नुकसान टळले असते, अशी भावना भुलोरी ग्रामस्थांनी व्यक्त केली. मंगळवारच्या अग्निकल्लोळाने अग्निशमन पथकाची निकड पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

There is no fire burner! | धारणीत अग्निशमनवाहनच नाही !

धारणीत अग्निशमनवाहनच नाही !

Next

धारणी : सन २०१३ नंतर सहा वर्षांनी पुन्हा एकदा भुलोरी गावाने अग्निप्रलय अनुभवला. सहा वर्षांपूर्वीचे कटू अनुभव बाजूला सारत आदिवासी बांधवांनी नवा आशियाना उभारला. मात्र, आज पुन्हा तो आशियाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. कदाचित धारणी मुख्यालयी अग्निशमन यंत्रणा असती, तर झालेले नुकसान टळले असते, अशी भावना भुलोरी ग्रामस्थांनी व्यक्त केली. मंगळवारच्या अग्निकल्लोळाने अग्निशमन पथकाची निकड पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
चार वर्षांपूर्वी धारणी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. नगरपंचायत वा तहसील प्रशासन आता अग्निशमन यंत्रणा उभारेल, अशी भाबडी आशा धारणीकरांना होती. मात्र ती फोल ठरली. धारणी तालुक्यात एकूण १५२ गावे आहेत. त्यातील अनेक गावे दुर्गम व अतिदुर्गम क्षेत्रात मोडतात. मात्र तालुक्यात कुठेही आग लागली की, अचलपूर, चिखलदरा पालिकेची मदत घ्यावी लागते. काही वर्षांपूर्वी सेमाडोह येथे असाच अग्निकल्लोळ उठला होता. आता भुलोरीत २०१३ ची पुनरावृत्ती झाली. त्याअनुषंगाने धारणी मुख्यालयी अग्निशमन यंत्रणा असावी, अशी आदिवासींची मागणी आहे.
अग्निशामक पथक पोहोचले चार तासाने
दुपारी २ वाजता आग लागल्याची माहिती मिळताच तालुका प्रशासनाने अचलपूर नगरपालिकेचे अग्निशमन वाहन व पथक बोलाविले. ते ९० किमी प्रवास करुन सायंकाळी ६ च्या सुमारास भुलोरी येथे पोहोचले. तत्पूर्वी बºहाणपूर, खंडवा व चिखलदरा येथील पथक पोहोचले.
यांची जळाली घरे
भुलोरी येथे मंगळवारी लागलेल्या आगीत मनीराम जांभेकर, राधाकिसन मावस्कर, नारायण सज्जुलाल मावस्कर, राजाराम धांडे, कलांसिंग भिलावेकर, धनु कासदेकर, भाऊलाल दहेकर, रामसिंग कासदेकर, बिसराम दहेकर, किशोर भिलावेकर, नामदेव जावरकर, शंकर जावरकर, शालिकराम भिलावेकर, हरिराम दहेकर, मोतीराम सानू, मान्सू भिलावेकर, रमेश सेलेकर, झनकलाल कासदेकर यांची घरे जळाली.

Web Title: There is no fire burner!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.