बंधपत्राचा भंग करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांकडून वसुली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 01:21 AM2018-05-21T01:21:01+5:302018-05-21T01:21:01+5:30

गत ३५ वर्षांत सरळसेवेतील वनविभागाची सेवा सोडून गेलेल्या अशा उमेदवारांकडून बंधपत्रातील करारानुसार प्रधान मुख्यवनसंरक्षक, प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांनी एकही रुपया वसूल केला नाही.

There is no recovery from the violators of the brochure | बंधपत्राचा भंग करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांकडून वसुली नाही

बंधपत्राचा भंग करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांकडून वसुली नाही

Next

अमरावती : बंधपत्राचा भंग केल्यानंतरही वनविभागात सरळसेवेतील वनक्षेत्रपाल (आरएफओ), सहायक वनसंरक्षक (एसीएफ) यांच्याकडून करारानुसार रक्कम वसूल करण्यात आलेली नाही. ही संख्या शेकडोच्या घरात असून, त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे.
सन १९७६पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक वनसंरक्षक वर्ग २ ची पदे आता वर्ग १ची झाली आहेत. सन १९९०पासून वर्ग २च्या पदांसाठी उमेदवारांची निवड भरती नियमानुसार केली जाते.
या उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यापूर्वी राज्य सरकारचे त्या उमेदवारास पाच वर्षे सेवा करण्याचे बंधपत्र देण्याचे करारानुसार बंधनकारक आहे. या पत्रातील शर्तींचा भंग केल्यास अथवा मध्येच सेवा सोडून गेल्यास प्रशिक्षणावर झालेला पूर्ण खर्च व उर्वरित पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत उमेदवारांवर खर्च केलेली रक्कम वसूल करणे बंधनकारक आहे.
गत ३५ वर्षांत सरळसेवेतील वनविभागाची सेवा सोडून गेलेल्या अशा उमेदवारांकडून बंधपत्रातील करारानुसार प्रधान मुख्यवनसंरक्षक, प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांनी एकही रुपया वसूल केला नाही.

सरळसेवेतील आरएफओ, एसीएफ यांनी केला भंग
वनविभागात सरळेसेवेत सहायक वनसंरक्षकपदी रूजू झालेत. मात्र, कालावधी पूर्ण न करता मध्येच दुसरीकडे नोकरी स्वीकारल्यास बंधपत्रातील तरतुदींनुसार भंग केल्याची नोंद आहे. यात सरळसेवेतील सहायक वनसंरक्षक शेषराव पाटील, चंद्रकांत खाडे, एस. के. सिसोदिया, अशोक रामटेके, एस. बी. गायकवाड तर वनक्षेत्रपाल म्हणून डी. गुजेला, रामचंद्र पोळे, संभाजी गवई, वडतकर, सैंगदाने, कुळकर्णी, भालेकर आदीचा समावेश आहे.
 

Web Title: There is no recovery from the violators of the brochure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी