१०० टक्के अनुदानाच्या घोषणेशिवाय माघार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 10:20 PM2018-07-11T22:20:20+5:302018-07-11T22:20:36+5:30

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिष्टमंडळाला दिलेल्या आश्वासनावर महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती समाधानी नाही. सभागृहात जोवर १०० टक्के अनुदानाची घोषणा होत नाही, तोवर माघार घेणार नाही, असा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी दिली.

There is no retreat without 100% declaration of subsidy | १०० टक्के अनुदानाच्या घोषणेशिवाय माघार नाही

१०० टक्के अनुदानाच्या घोषणेशिवाय माघार नाही

googlenewsNext
ठळक मुद्देशेखर भोयर : पावसात नागपूरच्या टी पॉर्इंटवर शिक्षकांनी काढली रात्र

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिष्टमंडळाला दिलेल्या आश्वासनावर महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती समाधानी नाही. सभागृहात जोवर १०० टक्के अनुदानाची घोषणा होत नाही, तोवर माघार घेणार नाही, असा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीचा महाआक्रोश मोर्चा आपल्या मागण्यांसाठी मंगळवारी विधिमंडळावर काढण्यात आला. यावेळी कृती समितीच्या शिष्टमंडळाची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. यावर त्यांनी सभागृहात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, या आश्वासनावर महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कुती समिती समाधानी नाही. या शिष्टमंडळामध्ये नागपूर विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाचे आमदार ना.गो. गाणार, महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष तात्यासाहेब म्हैसकर, उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर, नितीन टाले, संगीता शिंदे, पी.आर. ठाकरे, सुधाकर वाहुरवाघ, अजय भोयर, सुरेश शिरसाठ, कामनापुरे, आर.झेड. बाविस्कार आदींचा सहभाग होता.

Web Title: There is no retreat without 100% declaration of subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.