जलशिवारसाठी निधीची कमी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 01:29 AM2018-04-13T01:29:06+5:302018-04-13T01:29:06+5:30

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या गत दोन वर्षांतील कामांचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत. ही कामे राबविण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. प्रशासनाकडून तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेला विलंब होता कामा नये.

There is no shortage of water for the water reservoir | जलशिवारसाठी निधीची कमी नाही

जलशिवारसाठी निधीची कमी नाही

googlenewsNext
ठळक मुद्देराम शिंदे यांची ग्वाही : जलसंधारणाची कामे वेळेत पूर्ण करावी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या गत दोन वर्षांतील कामांचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत. ही कामे राबविण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. प्रशासनाकडून तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेला विलंब होता कामा नये. १५ जूनपूर्वी कामे पूर्ण करा, असे निर्देश जलसंधारण मंत्री राम शिंंदे यांनी गुरुवारी कवठे बहाळे येथे दिले.
भातकुली तालुक्यातील कवठे बहाळे या गावात आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजनेतून विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्यांची पाहणी व जिल्ह्यातील कामांच्या प्रगतीचा आढावा शिंंदे यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, उपविभागीय अधिकारी विनोद शिरभाते, उपजिल्हाधिकारी डी.आर. काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, सरपंच सविता सगणे, उपसरपंच विलास सदार, संजय सगणे आदी उपस्थित होते.
नाला खोलीकरणास आठवडाभरात मंजुरी द्यावी. प्रशासनाने जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांना गती द्यावी.
ग्रामपातळीवर कृषी सहायकांनी शेतकऱ्यांना मृदा चाचणी पत्रिकांचा वापर, निविष्ठा कुठल्या वापराव्यात, शेततळी, जलसंधारणाचे महत्त्व याबाबत वेळोवेळी माहिती दिली पाहिजे.शेततळ्यासाठी शेतजमिनीतील थोडे क्षेत्र व्यापले गेले तरी रब्बीसाठी पाणी उपलब्ध राहून पूर्वीच्या तुलनेत उत्पन्न वाढते. त्यामुळे संरक्षित सिंंचनाचे महत्त्व शेतकरी बांधवांना पटवून दिले पाहिजे, असे ना. शिंदे म्हणाले.

Web Title: There is no shortage of water for the water reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.