प्रेमात ‘रिचार्ज’साठी झाली कुरबूर; तिने धावत्या रेल्वेसमोर स्वतःला झोकून दिले!

By प्रदीप भाकरे | Published: May 19, 2023 05:31 PM2023-05-19T17:31:41+5:302023-05-19T17:32:06+5:30

Amravati News प्रेमात मोबाईल रिचार्जवरून कुरबुर झाल्याने युवतीने थेट टोकाचा निर्णय घेऊन स्वत:ला धावत्या रेल्वेसमोर झोकून दिले. तिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या प्रियकराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला

There was a clamor for 'recharge' in love; She threw herself in front of a running train! | प्रेमात ‘रिचार्ज’साठी झाली कुरबूर; तिने धावत्या रेल्वेसमोर स्वतःला झोकून दिले!

प्रेमात ‘रिचार्ज’साठी झाली कुरबूर; तिने धावत्या रेल्वेसमोर स्वतःला झोकून दिले!

googlenewsNext

प्रदीप भाकरे 
अमरावती: प्रेमात मोबाईल रिचार्जवरून कुरबुर झाल्याने युवतीने थेट टोकाचा निर्णय घेऊन स्वत:ला धावत्या रेल्वेसमोर झोकून दिले. तिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या प्रियकराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तर, १९ मे रोजी त्याला अटक देखील करण्यात आली. अर्पित बाबुराव गुबरे (२३, रा. शिरजगाव बंड, ता. चांदूरबाजार) असे अटक आरोपीचे नाव आहे.


             चांदूरबाजार तालुक्यातील एका गावची मुळ रहिवासी असलेली व सध्या गोपालनगरमध्ये भाडयाच्या खोलीत राहणाऱ्या २० वर्षीय तरूणीने १७ मे रोजी रात्री अमरावती मुंबई रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी मृत तरुणीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून १८ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास अर्पितविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. अर्पितनेच आपल्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असा तिच्या कुटुंबियांचा आरोप आहे. दरम्यान, राजापेठ पोलिसांनी आरोपीला शिरजगाव बंड येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आपण तिच्याशी लग्न केले होते, असे बयान अर्पितने दिले आहे, तर त्याने तिच्याशी लग्न केले नसल्याचा मृताच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

शेवटचा फोन अर्पितला
राजापेठ पोलिसांनी अंबा मंगलम कार्यालयासमोरच्या रेल्वे ट्रॅकवरून मृत तरूणीचा मोबाईल ताब्यात घेतला. त्यात शेवटचा कॉल अर्पितचा असल्याचे लक्षात आले. घटनेवेळी तो अमरावतीत नव्हता. मोबाईल रिचार्जसाठी तिचा कॉल आला होता. मात्र, आपण सध्या कामात आहोत, नंतर टाकतो, असे तिला बजावले. त्यावर आमच्यात वाद झाला. त्यातून तिने टोकाचा निर्णय घेतला असावा, असे बयान अर्पितने दिले आहे.

दोघांमध्ये उत्कट प्रेम
आरोपी व तरूणी एकाच तालुक्यातील रहिवासी. मृत तरूणी व अर्पित यांच्यात बऱ्याच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. उत्तरोत्तर ते वाढत गेले. ती आरोपीच्या घरी देखील पोहोचली होती. दरम्यान, ३ जानेवारी २०२२ रोजी अर्पित तिला प्रेमप्रकरणातून पळवून घेऊन गेला. त्यावेळी तिच्या कुटुंबियांनी चांदूरबाजार पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदविली होती. त्यानंतर दोघेही अमरावतीला सोबत राहत होते. मात्र, अर्पितनुसार, काही दिवसांपुर्वी दोघात कुरबुरी झाल्याने ती गोपालनगर भागात भाडयाने राहायची. तर तो शिरजगाव ते अमरावती अपडाऊन करायचा. घटनेच्या दिवशी तो गावला होता. मात्र, रिचार्जवरून त्यांच्यात वाद झाला.

मृत तरूणी व आरोपीमध्ये प्रेमसंबंध होते. त्यानेच आपल्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार मृताच्या नातेवाईकांनी केली. त्यावरून गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ अटक केली.
मनीष ठाकरे, ठाणेदार, राजापेठ

Web Title: There was a clamor for 'recharge' in love; She threw herself in front of a running train!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू