मेळघाटात पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 11:25 PM2018-04-01T23:25:50+5:302018-04-01T23:25:50+5:30

उन्हाळ्याची चाहूल लागण्याआधीच मेळघाटातील जीवनदायिनी तापी, गडगा, सिपना, खंडू, खापरा या नद्यांचे पात्र कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीकाठावर वसलेल्या व नदीवरच विसंबून राहणाऱ्या गावांना जनावरांसाठी पाण्याचीच नव्हे, शरीर स्वच्छ करण्यासाठीही समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे तहान भागविण्यासाठी नदीपात्रात झरे बनवून तृष्णातृप्ती करावी लागत आहे.

There is water in Melghat | मेळघाटात पाणी पेटले

मेळघाटात पाणी पेटले

Next
ठळक मुद्देनदी-नाले आटले : धारणी शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा

श्यामकांत पाण्डेय ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : उन्हाळ्याची चाहूल लागण्याआधीच मेळघाटातील जीवनदायिनी तापी, गडगा, सिपना, खंडू, खापरा या नद्यांचे पात्र कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीकाठावर वसलेल्या व नदीवरच विसंबून राहणाऱ्या गावांना जनावरांसाठी पाण्याचीच नव्हे, शरीर स्वच्छ करण्यासाठीही समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे तहान भागविण्यासाठी नदीपात्रात झरे बनवून तृष्णातृप्ती करावी लागत आहे.
मेळघाटची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणाºया धारणी शहरातही आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पाण्याच्या वापरात काटकसर करावयाची सूचना धारणी नगरपंचायतच्या अध्यक्ष रजियाबी सरफुद्दीन यांनी केली आहे. यंदाचा उन्हाळा अत्यंत तापदायक व त्रासदायक ठरणार असल्याचा अंदाज जलसंधारण विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे तालुकावासीयांनी आजपासूनच काटकसरी करण्याची आवश्यकता आहे.
अवैध उपसा नद्यांसाठी अभिशाप
मेळघाटातील वीज समस्या १३२ के.व्ही. वाहिनीमुळे संपुष्टात आली. त्यामुळे २४ तास वीजपुरवठा उपलब्ध होत असल्याने विहिरी व बोअरवेलचे जाळे गावोगावी निर्माण झाले आहे. पाण्याचा पर्याय जेथे उपलब्ध नाही, तेथे नदी-नाल्यांचे पात्र लक्ष्य करण्यात आले. रबी पिकासाठी नदी-नाल्यातून विना परवानगी सर्रास अवैधरीत्या पाणी उपसा करण्यात आला. आता उन्हाळी मुगासाठीही अवैध उपसा सुरू असल्याने नदी-नाल्यांचे पात्र कोरडे पडल्याने त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विजेअभावी रखडल्या योजना
मेळघाटातील जवळपास सर्वच गावांमध्ये जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. काही गावांमध्ये तर दोन-तीन योजना अस्तित्वात आहे. मात्र, पाण्याचे योग्य स्रोत नसल्याने अनेक गावांना आतापासूनच पाणीटंचाईचा झळ बसणे सुरू झाले आहे. या योजना पूर्वी विजेअभावी रखडत असताना, आता विहिरीचे पाणी संपल्याने गावकºयांना पाण्यासाठी एक-दोन किमी पायपीट करावी लागत आहे.

धारणी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी वाचविण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यास गावालगतच्या विहिरी व बोअरवेल अधिग्रहण करण्याची योजना आहे. त्यासाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. सध्या एकही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू केले नाही.
- उमेश देशमुख, गटविकास अधिकारी, पं. स. धारणी.

Web Title: There is water in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.