आली दिवाळी, ग्राहकांची बाजारात गर्दी
By admin | Published: November 11, 2015 12:11 AM2015-11-11T00:11:36+5:302015-11-11T00:11:36+5:30
प्रकाशपर्वाच्या सुरुवातीने दिवाळी सणाला प्रारंभ झाल्याचे दिसून येते. दिव्यांसोबतच रांगोळीची रंगत पाहायला मिळते.
आकर्षक दिव्यांसोबत रांगोळीची रंगत : नवीन वस्तू खरेदीसाठी उसळली गर्दी
अमरावती : प्रकाशपर्वाच्या सुरुवातीने दिवाळी सणाला प्रारंभ झाल्याचे दिसून येते. दिव्यांसोबतच रांगोळीची रंगत पाहायला मिळते. लखलखणाऱ्या प्रकाशाने आसमंत उजळून काढणारा हा सण आहे. बुधवारी दिवाळी सणानिमित्त ग्राहकांनी बाजारपेठेत खरेदीची धूम केली आहे. नवीन वस्तंूच्या खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी शहरात दिसून येत आहे.
दिवाळीचा उत्साह आबालवद्धांमध्ये संचारतो. लहानग्यासाठी फटाक्याचा आनंद तर वयोवृध्दांसाठी नातलगांच्या भेटीचे प्रसंगामुळे प्रेमभावना व्यक्त करणारा दिवस. धनतेरसच्या पर्वापासून नागरिकांच्या खरेदीची धूम शहरात पहायला मिळली. सोन्या-चांदीचे दागिने खरेदीसाठी सराफा बाजारात प्रचंड गर्दी उसळली होती. यंदा १०० कोटींच्यावर अमरावती शहरात उलाढाल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातच यंदा फटाक्याचा बाजार मंदावल्याचेही एकिकडे दिसून आले. फटाके, कपडे खरेदी, वाहने खरेदी, विविध पणत्या खरेदी, कृत्रिम फुले, लक्ष्मी देवी मूर्ती, शोभेच्या वस्तू व सोन्या-चांदीची खरेदीसाठी नागरिकांची चढाओढ लागली होती. दिवाळीच्या पर्वावर शहरात गर्दी उसळल्याने वाहतूक नियंत्रणचा बोजबारा वाजला होता.
राजकमल, राजापेठ, जयस्तंभ चौक, बापट चौक आदि वर्दळीच्या ठिकाणी पाय ठेवयलासुद्धा जागा नसल्याचे चित्रही दिसून आले.