ग्रामीण भागात २४९ कंन्टेन्मेंट झाेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:14 AM2021-03-26T04:14:51+5:302021-03-26T04:14:51+5:30
अमरावती : शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी, १४ ते २४ मार्च ...
अमरावती : शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी, १४ ते २४ मार्च या कालावधीत ग्रामीण क्षेत्रासह नगरपंचायत व नगरपालिकांच्या क्षेत्रात हॉट स्पॉटची संख्याही वाढली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागानुसार बुधवारपर्यंत जिल्ह्यात २४९ कन्टेन्मेंट झाेन आहेत. अचलपूर, तिवसा, अंजनगाव सुर्जी, मोशी, वरूड, नांदगाव खंडेश्र्वर, धारणी या तालुक्यांसह अन्य तालुक्यांतील १९२ गावांत कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण व नागरी क्षेत्र मिळून २४ मार्चपर्यंत २ हजार ५५ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.
ग्रामीण भागात कोरोना वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस मोजक्याच तालुक्यात बाधित आढळण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, मेळघाटातील धारणी व चिखलदरा व अन्य तालुक्यांतही आता कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे.
त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग सर्वच तालुक्यांत पोहोचला आहे. कोरोना चाचणीनंतर दररोज प्राप्त होणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकडेवारीत जवळपास १४ तालुक्यांतील गावांत व नागरी क्षेत्रात कोरोना बाधितांची नोंद होत आहे. परिणामी शहरासोबतच ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे.
बॉक्स
तालुकानिहाय ॲक्टिव्ह रुग्णसंख्या
तालुका ॲक्टिव्ह रुग्णसंख्या
अमरावती ९७
भातकुली ८२
मोशी १६७
वरूड २६१
अंजनगाव सुर्जी ९४
अचलपूर ३४९
चांदूर रेल्वे १३४
चांदूर बाजार १२९
चिखलदरा ३७
धारणी १४९
दर्यापूूर १६२
धामणगाव रेल्वे १३३
तिवसा २४१
नांदगाव खंडेश्र्वर ११५
एकूण २,०५५
कोट
ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाकडून कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करून चाचण्या केल्या जात आहे. सोबतच पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचारासह आवश्यक उपाययोजना करून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी