पोषण आहार रकमेसाठी पोस्ट बँकेचे खाते चालणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:11 AM2021-07-16T04:11:04+5:302021-07-16T04:11:04+5:30
अमरावती; उन्हाळ्याच्या सुटीमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देता न आल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे ...
अमरावती; उन्हाळ्याच्या सुटीमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देता न आल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याची अट शिथिल करीत आता पालकांच्या बँक अथवा पोस्टातील खात्यातही अनुदान रक्कम जमा केली जाणार आहे. यामुळे पालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
शालेय शिक्षण विभागाने मागील भाईदास सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठवून उन्हाळ्याच्या सुटीतील ३५ दिवसांची शालेय पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार जोडणी केलेल्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांची आधार क्रमांक जोडलेले खात्याची यादी ९ जुलैपर्यंत तयार करण्याचे निर्देश होते. मात्र, या ३५ दिवसांच्या पोषण आहाराची रक्कम किमान १५० ते कमाल २५० रुपये बहुतांश विद्यार्थ्यांची बँकेत खाते नाही. नवीन खाते उघडण्यासाठी ५०० ते १००० हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे पालकांनी खाते उघडण्याकडे पाठ फिरविली. यामुळे शिक्षक संघटनांनी पालकांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात यावी अथवा पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी केली होती.तसा अहवालही शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने शासनाकडे पाठविला होता.
बॉक्स
गावातील पोस्टात उघडा खाते
शिक्षक व पालकांची मागणी लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने सर्व शिक्षण उपसंचालकांना नवीन पत्र पाठवून आता विद्यार्थी-पालक संयुक्त खाते पालकांची खाते अथवा विद्यार्थ्याचे खाते यापैकी कोणती खाते चालणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यात आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्याची तातडीने आधार नोंदणी करून घेऊन तो क्रमांक बँक खात्याशी जोडण्याची निर्देश दिले असून पोस्ट पेमेंट बँकेचे खाते पोषण आहाराची रक्कम जमा करण्यासाठी पात्र असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे राष्ट्रीयीकृत बँकेत जाऊन खाते उघडण्याऐवजी पालक गावातील पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडू शकणार आहेत.