बाजार समितीत संचारबंदी होणार कठोर पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:36 AM2021-02-20T04:36:03+5:302021-02-20T04:36:03+5:30
शहरात कोरोनाचा वाढता कहर थांबविण्याच्या दृष्टीने जिल्हा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केलेल्या उपाययोजनांच्या नियमांचे पालन ...
शहरात कोरोनाचा वाढता कहर थांबविण्याच्या दृष्टीने जिल्हा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केलेल्या उपाययोजनांच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना विविध विभागाच्या प्रमुखांना शुक्रवारी आयोजित बैठकीत दिले. त्याअनुषंगाने बाजार समिती प्रशासनाने संबंधित अडते, व्यापारी व किरकोळ भाजीपाला, फळ व्यापार्यांना त्रिसूत्रीचे पालन करून नियमांची अंमलबजावणी करण्याचे सुचविले. शनिवारी रात्री ८ वाजतापासून यासंदर्भात बाजार समितीचे सचिव दीपक विजयकर, उपाध्यक्ष नाना नागमोते, अडते, खरेदीदार, प्रतिनिधी प्रमोद इंगोले, फळ व भाजीपाला विभागप्रमुख राजेंद्र वानखडे यांनी शुक्रवारी बाजार समितीच्या यार्डात फिरून विविध स्थळांची पाहणी केली. गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यास सांगितले. वाहन पार्किंगची जागा स्टेट बँकेसमोर नियोजित केली. तसेच बाजार समितीत गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने किरकोळ शेतमाल खरेदीकरिता येणार्यांना प्रवेशद्वारावरच रोखण्याचे निर्देश सुरक्षा रक्षकांना दिल्यात.
बॉक्स
विनामास्क व्यक्तींना प्रवेश निषेध
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, याकरिता मास्त व सोशल डिस्टंसिंग अत्यंत महत्त्वाचे असल्याने बाजार समितीत येणार्या प्रत्येक व्यक्तीने चेहर्यावर मास्क वा रुमाल बांधलेला असावा. अन्यथा प्रवेशद्वारावरूनच परत पाठविण्याचे सक्त निर्देश सुरक्षा रक्षकांना देण्यात आले आहे.
कोट
बाजार समिती प्रशासनिक अधिकारी म्हणून आम्ही चौघे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची भेट घेतली. त्यांच्या आदेशाचे काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने येथील कर्मचारी, अडते, व्यापार्यांना सूचना केली आहे. तसेच जनजागतीकरिता दर्शनी भागात सूचना फलही लावले आहेत.
- नरेंद्र वानखडे, सुरक्षा विभागप्रमुख, बाजार समिती, भाजीपाला विभाग