‘ते’ आले होते डॉक्टरांना ठगविण्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 10:46 PM2018-10-13T22:46:51+5:302018-10-13T22:47:08+5:30

बीएसएनएलच्या मेडिक्लेम पॅनलवर नियुक्तीचे आमिष दाखवून डॉक्टरांची आर्थिक लुबाडणूक करण्याच्या बेतात अमरावतीत आलेल्या आंतरराज्यीय टोळीला शहर पोलिसांनी शनिवारी गजाआड केले. डॉक्टरांवर त्यांनी जाळे टाकले; मात्र डॉक्टर व बीएसएनएल अधिकाऱ्याच्या तल्लख बुद्धीने ही ठगबाज टोळीच त्यात अडकली.

'They' came to thwart the doctor | ‘ते’ आले होते डॉक्टरांना ठगविण्यास

‘ते’ आले होते डॉक्टरांना ठगविण्यास

Next
ठळक मुद्देमनसुबे उधळले : बनावट मतदान कार्ड दाखवून शहरात मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बीएसएनएलच्या मेडिक्लेम पॅनलवर नियुक्तीचे आमिष दाखवून डॉक्टरांची आर्थिक लुबाडणूक करण्याच्या बेतात अमरावतीत आलेल्या आंतरराज्यीय टोळीला शहर पोलिसांनी शनिवारी गजाआड केले. डॉक्टरांवर त्यांनी जाळे टाकले; मात्र डॉक्टर व बीएसएनएल अधिकाऱ्याच्या तल्लख बुद्धीने ही ठगबाज टोळीच त्यात अडकली.
अमरावतीत शहरातील नामचीन डॉक्टरांची इत्थंभूत माहिती काढण्यासाठी चार ठकबाजांची आतंरराज्यीय टोळी ८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी अमरावतीत दाखल झाली. त्यांनी बनावट इलेक्शन कार्ड दाखवून अंबादेवी रोडवरील आर.के. हॉटेलमध्ये रूम मिळविली. रमेश प्रजापती असे मूळ नाव असलेल्या आरोपीच्या इलेक्शन कार्डवर संजयसिंग राजवीरसिंग, तर मो. सफदर याच्या कार्डवर सुशीलकुमार बलवीर अशी नावे होती. पसार झालेले अजयकुमार नरेशकुमार व अरविंद कुमार किसनलाल यांनीही बनावट इलेक्शन कार्ड वापरल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले आहे. लॉजमधून बाहेर पडल्यानंतर विविध हॉस्पिटलची पाहणी करणे, तेथील कर्मचारी व डॉक्टरांची भेट घेणे, त्यांच्याकडून माहिती काढणे व मोबाइल क्रमांक घेणे असा त्यांचा नित्यक्रम होता. संबंधित डॉक्टरांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क करून व मेडिक्लेमची माहिती देऊन या टोळीने भेटण्याची वेळ निश्चित करण्यास सुरुवात केली होती. १२ आॅक्टोबर रोजी ते बख्तार हॉस्पिटलला गेले. मात्र, डॉ. विजय बख्तार यांना त्यांनी दिलेल्या दस्तावेजांवर संशय आला. त्यांनी बीएसएनएल अधिकाºयांशी केल्याने ठगबाजीचा हा गंभीर प्रकार उघड झाला, अन्यथा या ठगबाजाच्या जाळ्यात डॉक्टर अडकण्याची दाट शक्यता होती.

हॉटेलच्या रूमची झडती घेणार
आंतरराज्यीय टोळीतील या आरोपींनी राज्यभरात काही डॉक्टरांना फसविले आहे. त्यांनी आता अमरावतीतील डॉक्टरांवर लक्ष केंद्रित केले होते. बनावट मतदान कार्ड दाखवून ते थांबले होते, त्या हॉटेलच्या खोलीतून आरोपींविरुद्ध आणखी पुरावे मिळतील, हे गृहीत धरून झडती होणार आहे.

या पोलीस पथकाची कामगिरी
पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर व उपायुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम व राजापेठचे ठाणेदार किशोर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राम गिते, आशिष देशमुख, पोलीस शिपाई विनोद गाडेकर, विजय पेठे, अजय मिश्रा, नीलेश पाटील, सै. इम्रान, दीपक दुबे, एहजाज शाह, दिनेश नांदे, सुलतान, उमेश कापडे, चालक बैरड तसेच राजापेठचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन मेहेत्रे यांच्या पथकातील वाटाणे, प्रेम रावत यांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली.

Web Title: 'They' came to thwart the doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.