ना हातात बसतात, ना खिशात मावतात; असे मोबाईल चोरांना सोईचे ठरतात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 01:57 PM2021-08-14T13:57:37+5:302021-08-14T13:58:14+5:30
Amravati News अलीकडे आकाराने मोठे असलेले मोबाईल वापरणाऱ्यांच्या संख्येत भर पडली आहे. ते मोबाईल ना हातात बसतात, न खिशात मावतात. त्यामुळे की काय, मोबाईल चोरणे चोरांसाठी सोईचे ठरत असल्याची स्थिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात मोबाईल चोरीचे प्रमाण अलीकडे वाढतेच आहे. मात्र, मोबाईल जीवनावश्यक वस्तू बनली आहे. अनेक जण दोन ते तीन मोबाईल वापरतात. अलीकडे आकाराने मोठे असलेले मोबाईल वापरणाऱ्यांच्या संख्येत भर पडली आहे. ते मोबाईल ना हातात बसतात, न खिशात मावतात. त्यामुळे की काय, मोबाईल चोरणे चोरांसाठी सोईचे ठरत असल्याची स्थिती आहे. (Big size mobile are problematic)
चोरी नव्हे गहाळ म्हणा
१) मोबाईल चोरीची तक्रार घेऊन गेल्यास ती तक्रार ‘गहाळ’ म्हणून नोंदविली जाते.
२) एफआयआरची विनंती केल्यास समुपदेशन केले जाते.
३) गहाळ म्हटल्यास लवकर तपास होईल, असेही सांगितले जाते.
४) सायबर पोलिसांकडे जाण्याचा सल्लादेखील दिला जातो.
या भागांमध्ये मोबाईल सांभाळा
१) अंबादेवी यात्रेमध्ये भाविकांची तुफान गर्दी असते. तेथे मोबाईल चोर सक्रिय असतात.
२) स्थानिक इतवारा बाजार, शुक्रवार बाजारात मोठी ग्राहकी असते. तेथेही तुमचा मोबाईल लक्ष्य केला जातो.
३) सायन्स कोअर मैदान, नेहरू मैदानातील गर्दीतही मोबाईल चोर संधी शोधतात.