ते ‘ब्राऊनी’लाही कापून खाणार होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 09:43 PM2017-08-02T21:43:18+5:302017-08-02T21:44:50+5:30

दोन ते तीन महिन्यांपूर्वी देशपांडेवाडी परिसरात राहणाºया लांडगे कुंटुंबीयांचा ब्राऊनी नावाचे श्वान परप्रांतीय विद्यार्थ्यांची शिकार होणार होते.

They had to eat 'Bruni' too | ते ‘ब्राऊनी’लाही कापून खाणार होते

ते ‘ब्राऊनी’लाही कापून खाणार होते

googlenewsNext
ठळक मुद्देलांडगे कुंटुंबीयांच्या सजगतेने टळला अनर्थ : गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून विलंब

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दोन ते तीन महिन्यांपूर्वी देशपांडेवाडी परिसरात राहणाºया लांडगे कुंटुंबीयांचा ब्राऊनी नावाचे श्वान परप्रांतीय विद्यार्थ्यांची शिकार होणार होते. मात्र, लांडगे कुटुंबाच्या श्वानप्रेमामुळे ब्राऊनीच्या मांसाची पार्टी रंगण्यापूर्वीच वसतिगृहातून ब्राऊनीला सोडविण्यात आले. यासाठी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसोबत वादही करावा लागला.
स्थानिक श्रीहनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रांतीय विद्यार्थी श्वान कापून खात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर परिसरातील नागरिक बोलू लागले आहेत. या वसतिगृहामागील परिसरात म्हणजे देशपांडेवाडीत अनेकांनी कुत्रे पाळले आहेत. याच परिसरातील रहिवासी पुष्पा लांडगे यांनी ब्राऊनी नामक श्वान पाळला आहे. त्याची योग्य ती देखभाल करणे व त्याला दररोज फिरायला नेण्याचे काम लांडगे कुंटुंबातील सदस्य करतात. ब्राऊनीला ते घरातील सदस्यांप्रमाणेच वागणूक देतात. ब्राऊनीबद्दल सर्वांनाच जिव्हाळा आहे. मात्र, एक दिवस ब्राऊनी बेपत्ता झाली. लांडगे कुटुंबियांनी तिची शोधाशोध केली. देशपांडेवाडीतील प्रत्येक भाग त्यांनी हुडकला. मात्र, ती आढळली नाही. अखेर ब्राऊनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या आवारात तर गेली नाही ना, अशी शंका लांडगे कुटुंबाला आली. त्यातच वसतिगृहात परप्रांतीय विद्यार्थी राहतात आणि ते श्वान सुध्दा खात असल्याची कुणकुण लांडगे कुटुंबाला लागली.
विद्यार्थ्यांची पाठराखण ?
अमरावती : त्यामुळे त्यांनी त्यादिशेने ब्राऊनीचे शोधकार्य सुरू केले. संपूर्ण वसतिगृहाची झडती घेतल्यानंतर परप्रांतिय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात ब्राऊनीला बंद करून ठेवल्याची माहिती त्यांना मिळाली. मात्र, वसतिगृहात प्रवेश कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला. अखेर नाथवाडी परिसरातील या वसतिगृहात जाण्यासाठी लांडगे कुटुंबातील सदस्यांनी चार ते पाच युवकांना सोबत घेतले. त्यांनी बंद खोलीतून ब्राऊनीला सोडविण्याचा प्रयत्न केला असता तेथील काही विद्यार्थ्यांनी विरोध केला. अखेर शाब्दीक वादानंतर त्यांनी ब्राऊनीची सुटका केली.
त्या परप्रांतिय विद्यार्थ्यांनी ब्राऊनीला कापून खाण्याची सर्व तयारी केल्याचे आढळून आले. भाजीचा सर्व मसाला विद्यार्थ्यांनी तयार करून ठेवला होता. यापूर्वीही हिन्दू स्मशानभूमी परिसर आणि गौरक्षण परिसरातील श्वान हरविल्याविषयी नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. या नागरिकांनीही परप्रांतिय विद्यार्थ्यांवर श्वान कापून खाण्याचा आरोप केला होता. मात्र, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाकडून विद्यार्थ्यांच्या याकृत्याची पाठराखण होत असल्याची माहिती आहे.
‘त्या’ विद्यार्थ्यांना रस्टिकेट करू
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकररा वैद्य यांनी श्वान भक्षक विद्यार्थ्यांच्या कृत्याची गंभीर दखल घेतली आहे. वसतिगृहातील त्या विद्यार्थ्यांची चौकशी सुरु करण्यात आली असून श्वान खाणाºयांची माहिती मिळताच त्यांना थेट रस्टीकेट करण्यात येईल, असे आश्वासन वैद्य यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. श्रीहनुमान व्यायाम प्रसारक मंडळात विविध प्रातांतून विद्यार्थी शिकायला येतात. त्यांचा धर्म व सवयी वेगवेगळ्या असतात. त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा व्हावी, यासाठी त्यांचे आई-वडिल त्यांना श्रीहव्याप्र मंडळात पाठवितात. त्यांना चांगल्या सवयी लावण्याचे प्रयत्न केले जातात. मात्र, काही विद्यार्थी छुप्या मार्गाने त्यांच्या आवडी पूर्ण करतात. अशा विद्यार्थ्यांना सांभाळून आखाड्यात कामकाज केले जात असल्याचेही वैद्य यांनी सांगितले. श्वान भक्षकांचा शोध घेण्यासाठी श्रीहव्याप्र मंडळ प्रशासन व पोलीस प्रयत्न करीत असून त्यासंदर्भात बैठक घेण्यात आल्याचे वैद्य यांनी सांगितले.
श्वानभक्षक पोलिसांच्या रडारवर
श्रीहनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी श्वान कापून खाल्ल्याची तक्रार हनुमंत रंगराव शेळके यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. मात्र, राजापेठ पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली नाही. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी याबाबीची दखल घेऊन पोलीस पथकाला चौकशीकरिता पाठविले. चौकशीअंती काय कारवाई करण्यात येईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: They had to eat 'Bruni' too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.