'ते' रोडरोमिओ पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 10:50 PM2018-05-30T22:50:00+5:302018-05-30T22:50:00+5:30

भरदिवसा पायी जाणाऱ्या तरुणींची छेडखानी करणारे दोन रोडरोमिओ अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडले. फे्रजरपुरा व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना हुडकून काढले असून, पोलिसांच्या या संवेदनशील व तत्पर कारवाईची राज्यभरात चर्चा सुरू आहे.

'They' in the trap of the Roadrmio Police | 'ते' रोडरोमिओ पोलिसांच्या जाळ्यात

'ते' रोडरोमिओ पोलिसांच्या जाळ्यात

Next
ठळक मुद्देछेडखानीचा व्हिडीओ : पोलिसांनी तातडीने केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भरदिवसा पायी जाणाऱ्या तरुणींची छेडखानी करणारे दोन रोडरोमिओ अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडले. फे्रजरपुरा व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना हुडकून काढले असून, पोलिसांच्या या संवेदनशील व तत्पर कारवाईची राज्यभरात चर्चा सुरू आहे.
पोलीस सूत्रानुसार, सुरज भगवान पंडित (२०) व एक अल्पवयीन (दोन्ही राहणार आशियाना क्लबमागे, वडाळी परिसर) अशी आरोपींची नावे आहेत. पायी जाणाºया मुलींची छेड काढत असलेले व्हिडीओ शहरातील एका सुजाण नागरिकाने काढला. याच व्हिडीओच्या आधारे ‘लोकमत’ने लोकदरबारी सविस्तर वृत्त मांडले सोबतच तो व्हिडीओ ‘लोकमत’च्या वेबसाइटवर अपलोड केला. राज्यासह देशभरात तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. घटनेची गंभीरता पाहता पोलिसांनी संवेदनशीलपणे तपासकार्य सुरू केले होते. त्या रोडरोमिओंच्या दुचाकी क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी आरोपी निष्पन्न केले. ती दुचाकी देविदास देवरे नामक व्यक्तीच्या नावे असून, त्यांनी ती दुचाकी हंसराज खडसे यांना विक्री केली. त्यानंतर ती दुचाकी एक गॅरेज चालविणाºया व्यक्तीने विकत घेतली. त्याच्याकडून ती दुचाकी आरोपी १७ वर्षीय मुलीने खरेदी केल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे. त्यानंतर पोलिसांनी सगळीकडून तपासाची सूत्रे हलवून दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने पकडले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राम गिते यांच्या पथकातील पोलीस शिपाई श्याम, विनय, सुभाष, राजूआप्पा, इंद्रजित यांनी दुचाकी चालविणारा बिच्छुटेकडीतील रहिवासी त्या १७ वर्षीय तरुणाचा शोध घेऊन त्याला मंगळवारी उशिरा रात्री ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे दुचाकीवर मागे बसून मुलींचा दुपट्टा ओढणाºया सूरज पंडितला फे्रजरपुराचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या पथकातील शिपाई अमोल मनोहर, सतीश विघे, दिनेश जवंजाळ यांनी बुधवारी सकाळी अटक केली. पोलिसांनी त्यांंची दुचाकी जप्त केली आहे. त्यांची पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमक्ष पेशी करण्यात आली. दोघांचीही कानउघाडणी करून त्यांनी सक्त ताकीद दिली. या प्रकरणात दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३५४, ३५४(ब) (विनयभंग), ३३६, ३४१ (अडवणूक करणे), आरडब्ल्यू ५/१८० (दुसºयाची दुचाकी चालविणे), ३/१८१(परवाना नसणे) व १३०, १७७ (वाहनाचे दस्तावेज नसणे) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
तीन मुलींची काढली छेड
सूरज पंडित व १७ वर्षीय अल्पवयीन दुचाकी क्रमांक एमएच ३१ क्यू ७७९७ ने पंचवटीकडून चपराशीपुºयाकडे जात होते. अल्पवयीन दुचाकी चालवीत होता. सूरजने मागील सीटवरून पंचवटी चौकात प्रथम एका मुलीची छेड काढली. त्यानंतर पुढे बियाणी चौकात छेड काढली. हा प्रकार एका चारचाकी वाहनातील तरुणाने कॅमेºयात कैद केला व पाठलाग केला. त्यावेळी सूरजने चपराशीपुरा चौफुलीवर आणखी एका मुलीची छेड काढली.
व्हिडीओ काढणाऱ्यास बक्षीस देणार
मुलींच्या छेडखानीचा व्हिडीओ काढणाऱ्याने कर्तव्यदक्ष नागरिकाची भूमिका बजावली आहे. त्यांचे हे कार्य समाजापुढे आदर्श निर्माण करणारे आहे. त्या व्यक्तीने रोडरोमिओंचे छेडखानीचे कृत्य उघड केले आहे. सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या त्या व्यक्तीचे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी कौतुक केले. त्या व्यक्तीला बक्षीस देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
छेडखानी करणाऱ्यांची माहिती द्या
‘लोकमत’ने छेडखानीचा तो व्हिडीओ व्हायरल केल्याने पोलिसांना आरोपी हुडकून काढणे सोपे झाले. समाजात अशा घटना बहुदा उजेडातच येत नाही. अशा प्रकारच्या कृत्यांवर नागरिकांनीही लक्ष असू द्यावे. अश्लील वा समाजविघातक कृत्य कोणीही करताना आढळून येत असेल, तर तत्काळ पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याशी थेट संपर्क करता येऊ शकते. याशिवाय पोलिसांच्या १०० किंवा ०७१२-२५५१००० या क्रमांकावर संपर्क साधून संबंधित व्यक्ती माहिती देऊ शकते.

मुलींच्या छेडखानी प्रकरणात दोघांना अटक केली असून, त्यांची दुचाकी जप्त केली आहे. अशाप्रकारचे कृत्य करणाºयांची माहिती नागरिकांनी कळवावी.
- दत्तात्रय मंडलिक
पोलीस आयुक्त

Web Title: 'They' in the trap of the Roadrmio Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.