बडनेरा रेल्वे स्थानकावर चोरट्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:10 AM2021-06-23T04:10:16+5:302021-06-23T04:10:16+5:30
बड़नेरा : बडनेरा रेल्वे स्थानकावर संशयितरित्या भटकणाऱ्या एका 26 वर्षीय चोरट्यास रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्याकडे बॅगेत विविध ...
बड़नेरा : बडनेरा रेल्वे स्थानकावर संशयितरित्या भटकणाऱ्या एका 26 वर्षीय चोरट्यास रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्याकडे बॅगेत विविध कंपन्यांचे 5 मोबाईल एक सोन्याची चैन नगदी असा 1 लाख 14 हजार रुपयांचा ऐवज मिळाला.
मोहम्मद रशीदुल्ला इस्लाम सलीम शेख वय 26 राहणार कमलाबारी गोविंदपुर जिल्हा मालनंदा बंगाल असे आरोपीचे नाव आहे सदर आरोपी 21 सोमवार रोजी बडनेरा रेल्वे स्थानकावर संशयित रित्या भटकत होता त्यादरम्यान पेट्रोलिंग वर असणाऱ्या उपनिरीक्षक हिरे ,मेश्राम ,शेळके, राहुल हिरोळे या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे जागेमध्ये वरील नमूद ऐवज मिळून आला त्याच्याविरुद्ध मोबाईल चोरीचा गुन्हा देखील दाखल असल्याचे समोर आले बडनेरा रेल्वे पोलिसांनी सदर आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सहा.पोलीस निरीक्षक अजितसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात अधिक तपास केल्या जात आहे.