तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2017 12:10 AM2017-06-23T00:10:56+5:302017-06-23T00:10:56+5:30
टोकन दिलेल्या तुरीच्या खरेदीसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी गुरूवारी दुपारी 3 वाजता नंतर दोन तास नायब तहसीलदार राठोड
तूर खरेदी करा : सामूहिक आत्मदहनाची धमकी
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : टोकन दिलेल्या तुरीच्या खरेदीसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी गुरूवारी दुपारी 3 वाजता नंतर दोन तास नायब तहसीलदार राठोड यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले. पाच जुलैच्या पूर्वीे टोकन दिलेली तूर खरेदी न केल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.त्यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली होती
तालुक्यात केंद्रात ३० मे पर्यंत तुरीची शासकीय खरेदी सुरू होती. त्यामुळे बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांंनी हजारो किंटल तूर विक्रीसाठी आनली.या शेतकऱ्यांना टोकन देऊन तूर खरेदीचे आश्वासन देण्यात आले.े मात्र शासनाने अद्यापही तूर खरेदी सुरू केली नसून शेतकऱ्यांंच्या घरातच तूर पडून आहे. त्यामुळे शासनाने तूर खरेदी केंद्र सुरू करून टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी या मागणीसाठी नायब तहसीलदार हरीश राठोड यांच्या कक्षात दोन तास ठिय्या आंदोलन केले मागणी मान्य न झाल्यास ५ जुलै नंतर कोणतीही सूचना न देता सामुहीक आत्मदहन करू असा इशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मुकूंद पुनसे,प्रमोद विघ्ने, त्रिशूल वानखडे,योगेश वडे,निलेश पुनसे,चंद्रकांत ठाकरे,राजेश कडगे, दिनेश गाडगे,प्रफुल्ल लवणकर,आदी शेतकरी उपस्थित होते.