महागड्या तुरीवर चोरांची नजर
By admin | Published: January 25, 2016 12:29 AM2016-01-25T00:29:14+5:302016-01-25T00:29:14+5:30
दुचाकी, मोबाईल, सोन्याचे दागिन्यांची चोरी ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे.
शेतकऱ्यांच्या मेहनतीवर डल्ला : नागरिकांमध्ये भिती
अमरावती : दुचाकी, मोबाईल, सोन्याचे दागिन्यांची चोरी ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे. तथापि तुरीच्या दराने गाठलेला उच्चांक पाहता भुरट्या चोरांची नजर शेतकऱ्यांच्या तुरीवरही गेली आहे. गेल्या आठवड्याभरात किमान लाखाच्या घरात असलेली तुरीवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. गेल्या काही दिवसापासून तुरीला नऊ हजारांपेक्षा अधिकचा दर मिळत आहे.
दुचाकी, मोबाईल वा सोन्याच्या दागिण्यांची विल्हेवाट लावताना चोरट्यांनासुद्धा ‘रिस्क’ असते. मात्र तूर कोणत्याही बाजारात विकून नगदी रक्कम पदरी पडते. अल्पवेळात बक्कल पैसा कमाविण्यासाठी चोरट्यांनी आता शेतकऱ्यांच्या शेतातील, घरातील तुरीला लक्ष्य केले आहे. बडनेरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पार्डी येथील अशोक दुधाने यांच्या घरातून चोरट्याने २२ जानेवारीला रात्री ३० हजाराची तूर लंपास केली तर २० जानेवारीच्या रात्री नया अकोला येथील विनोद तिडके यांच्या घरातून २ पोते तूर चोरीला गेली. त्याचदिवशी वलगाव येथील योगेश ठाकूर यांच्या घरातून २ कट्टे तूर लंपास करण्यात आली. (प्रतिनिधी)