चोर-पोलीस एकाच घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 01:17 AM2019-07-14T01:17:43+5:302019-07-14T01:18:20+5:30

पथ्रोट येथील बाबाजी फार्महाऊस येथे लग्नसमारंभात दागिने चोरून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली खरी; परंतु वस्तुस्थिती प्रकट झाली तेव्हा तेही चक्रावले. कारण ज्या भाड्याच्या घरातून त्याला अटक केली, त्याच्या वरच्या माळ्यावर रहिमापूरचे ठाणेदार राहतात.

Thieves - Police in the same house | चोर-पोलीस एकाच घरात

चोर-पोलीस एकाच घरात

Next
ठळक मुद्देआरोपीला अटक । पाच दिवसांची कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : पथ्रोट येथील बाबाजी फार्महाऊस येथे लग्नसमारंभात दागिने चोरून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली खरी; परंतु वस्तुस्थिती प्रकट झाली तेव्हा तेही चक्रावले. कारण ज्या भाड्याच्या घरातून त्याला अटक केली, त्याच्या वरच्या माळ्यावर रहिमापूरचे ठाणेदार राहतात. ठाणेदार व चोर एकाच घरात राहत असल्याचा योगायोग हा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
राहुल भामरे असे आरोपीचे नाव आहे. डवरे कुटुंबातील लग्न सोहळा १० जुलैला बाबाजी फार्महाऊसमध्ये सुरू असताना एका खोलीत ठेवलेल्या बॅगमधून भाग्यश्री रणजित सापधारे या वºहाडी महिलेचे ३६ ग्रॅम सोने व आठ हजार रुपये रोख चोरी गेल्याचे लक्षात आले. तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, एक अनोळखी तरुण खोलीत जाताना व बाहेर निघताना दिसून आला. त्याआधारे नव्याने रुजू झालेले ठाणेदार मनोज चौधरी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने आठ तासांत चोराचा शोध लावला.
सदर आरोपी अंजनगाव सुर्जी येथील देवगिरेनगर येथील प्रशांत गोमासे यांच्याकडे तीन महिन्यांपासून भाड्याने राहतो. दुसºया मजल्यावर रहिमापूरचे ठाणेदार जमील शेख हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत.
दरम्यान, आरोपीला हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. चोरीला गेलेले सोने पथ्रोट येथील सुवर्णकार देवराज माणेकर यांच्याकडून जप्त करण्यात आले आहे. त्याच्याकडून इतर गुन्हेसुद्धा उघडकीस येऊ शकतात, अशी माहिती ठाणेदार मनोज चौधरी यांनी दिली.

Web Title: Thieves - Police in the same house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.