बीजप्रक्रिया स्पर्धेत वाटाणे जिल्ह्यात तृतीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:17 AM2021-08-24T04:17:11+5:302021-08-24T04:17:11+5:30
आसेगाव पूर्णा : सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स यांच्या संयुक्त विद्यमाने १४ मे ते ...
आसेगाव पूर्णा : सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स यांच्या संयुक्त विद्यमाने १४ मे ते १५ जुलै दरम्यान आयोजित खरीप हंगाम बीजप्रक्रिया स्पर्धेत हिवरा पूर्णा येथील दिनेश वाटाणे यांनी जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातील ३२७ शेतकरी स्पर्धकांनी नोंदणी केली होती. यापैकी ४४ स्पर्धकांनी ऑनलाईन प्रक्रिया सादर केली. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध पद्धतीने बीजप्रक्रिया तंत्रज्ञान सांगावे, बीजप्रक्रिया एक लोकचळवळ व्हावी, रासायनिक खतांचा वापर कमी व्हावा, हे उद्देश डोळ्यांसमोर ठेवत स्पर्धा राबविण्यात आली. स्वातंत्र्य दिनी निकाल जाहीर करण्यात आला. त्यांना कृषिसहायक छाया देशमुख, आर.सी.एफ.चे जिल्हा व्यवस्थापक सतीश वाघोडे, जिल्हा समन्वयक मेघा नागमोते यांनी सहकार्य केले