महिलापटाचा थरार अन् दशकोत्तर परंपरा

By admin | Published: January 17, 2015 12:58 AM2015-01-17T00:58:48+5:302015-01-17T00:58:48+5:30

येथील इतिहासकालीन शंकरपटाला उसळलेली गर्दी मोठी असली तरी महिला शंकरपटाला एका दशकाची परंपरा कायम आहे़

Thirty-and-a-half-century tradition of female lecture | महिलापटाचा थरार अन् दशकोत्तर परंपरा

महिलापटाचा थरार अन् दशकोत्तर परंपरा

Next

मोहन राऊत/ वसंत कुळकर्णी तळेगाव दशासर
येथील इतिहासकालीन शंकरपटाला उसळलेली गर्दी मोठी असली तरी महिला शंकरपटाला एका दशकाची परंपरा कायम आहे़ येथे चार दिवसांत कोट्यवधी रूपयांची उलाढाल होते़ गेल्या दोन दिवसांतच ५० हजार शेतकऱ्यांनी या ऐतिहासिक पटात हजेरी लावली़
येथे मागील १० वर्षांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यातील पळशी येथील उषा ढोले या महिलेने या पटात बैलजोड्या उतरविल्या होत्या. त्यावेळी १२़८७ सेकंदात सर्जा-राजा या बैलजोडीने पहिला क्रमांक पटकाविला होता़ त्यानंतर भारती यावले या महिलेने पटात धुरकरी म्हणून कामगिरी बजावली होती़ सामाजिक कार्यकर्त्या क्रांतिबेन जोशी यासुध्दा या पटात सहभागी होत असत. महिलांची गर्दी वाढत असल्यामुळे आपल्या संकल्पनेतून कृषक सुधार मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब देशमुख यांनी तेव्हापासून महिलांककिता एक दिवसीय पटाला सुरूवात केली़ आज या पटाने भव्यरूप धारण केले आहे़ तालुक्यातील मलातपूर, धामणगाव, वसाड यासह विदर्भातील महिला धुरकरी पटात सहभागी होतात़ या दिवशी पुरूषाप्रमाणे महिला शंकरपटाची सूत्रे सांभाळतात. नोंदणी करणे, जोड्या जुंपणे, घडाळीची नोंद करणे, जोड्या हाकणे, बक्षीस वितरण करणे ही जबाबदारी महिला सक्षमपणे हाताळतात़ देशातील हा अभिनव उपक्रम केवळ तळेगावातच राबविला जात असल्याने देश -विदेशातील प्रसार माध्यमेही या पटाची दखल घेतात. यामुळे महिलापट विदर्भात प्रसिद्ध आहे.
५० हजार शेतकऱ्यांची उपस्थिती
तालुका कृषी अधिकारी व कृषी तंत्रज्ञान व्यसवस्थापन यंत्रणा यांच्यावतीने कृषी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली.या प्रदर्शनीत आधुनिक यंत्राचा बोलबाला आहे़ ट्रॅक्टर व बैलजोडीने पेरणी यंत्र गहू, भातकापणी, तणकापणी यासह सोयाबीन रेफर, पॉवर स्प्रे, ठिबक सिंचनावरील उत्पादित झालेली तूर, गांडूळ खत, हळद, १० किलोची कोबी, मोसंबी, संत्रा, हळद यांचे प्रात्यक्षिक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत़ या प्रदर्शनीत तब्बल ३० शेतकऱ्यांनी आपले स्टॉल लावले. विविध कंपन्यांनी आपल्या उत्पादित मालांची माहिती येथील प्रदर्शनीत देण्यासाठी पुढाकार आहे. दोन दिवसांत तब्बल ५० हजार शेतकऱ्यांनी भेटी दिल्यात आहेत़ विविध तंत्रज्ञानांची माहिती येथे उपलब्ध होत असल्यामुळे शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे़ शेतकऱ्यांना यापुढे मजुरांवर अवलंबून न राहता आधुनिक तंत्रज्ञान व अवजारे, यंत्रसामग्री येथे पाहायला मिळते़ ५० टक्के मजुरांची व पाण्याची बचत ठिबक तुषारमुळे मिळत असल्याने दीपक मानवटकर यांनी लावलेल्या प्रगती अ‍ॅग्रो या स्टॉलकडे शेतकरी वळले असल्याचे या प्रदर्शनीत दिसत आहे़ तीन दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनीसाठी तालुका कृषी अधिकारी एसक़े़ सत्यवान,मंडळ कृषी अधिकारी आऱ के़ होले, व्ह़ीएम़ बारबैल, सुदत्ता खडसे, कृषी सहायक संघटनेचे तालुकाध्यक्ष गोरख वावरे, विष्णू डुकरे, जे़डी़ गडमडे, ए़बी़ दहाट, ए़बी़ पाटणकर, वैशाली सोनवणे, एस़जी़ अडसड, आय़यू मापारी, अनंता खंडागळे, प्रफुल्ल नवले, सचिन शिंदे, सविता शिंदे, मनीष कुंभारे, उपेंद्र इंगोले, विक्रांत उके, आत्मा विभागाचे नितीन गोंडाने, दिनेश मोंढे, सुभाष तायडे, कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत़

Web Title: Thirty-and-a-half-century tradition of female lecture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.