'त्या' नऊ गोचीडांमुळे मातोश्रीवर आली ही वेळ; संदिपान भुमरे यांची टीका

By गणेश वासनिक | Published: September 25, 2022 07:25 PM2022-09-25T19:25:28+5:302022-09-25T19:27:33+5:30

संदिपान भुमरे हे गत दोन दिवस अमरावती जिल्ह्यच्या दौऱ्यावर होते.

This time came to Matoshree due to 'those' nine people; Criticism by Sandipanrao Bhumre | 'त्या' नऊ गोचीडांमुळे मातोश्रीवर आली ही वेळ; संदिपान भुमरे यांची टीका

'त्या' नऊ गोचीडांमुळे मातोश्रीवर आली ही वेळ; संदिपान भुमरे यांची टीका

Next

अमरावती : बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मोठी बांधली आणि शिवसेना उभी झाली. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हा फॉर्म्युला मोडीत काढत ‘त्या’ नऊ गोचीडांनी सर्व सामान्य कार्यकर्त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचू दिले नाही. त्यामुळे आज शिंदे गटाने उठाव केला, अशी टीका राज्याचे राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या यांनी केली. 

संदिपान भुमरे हे गत दोन दिवस अमरावती जिल्ह्यच्या दौऱ्यावर होते. रविवारी नागपूरकडे जाताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर बोट ठेवले. मातोश्री हे तमाम शिवसैनिकांचे आधारस्तंभ आहे. मात्र, या मातोश्रीत उद्वव ठाकरे यांच्या जवळील नऊ गोचीडांनी पुरती शिवसेना धुळीस मिळविली, असा टोला सुद्धा त्यांनी लगावला.  

भाजप आणि शिवसेना युतीतून लढले. सत्तेत बसायच्या वेळेस काही लोकांनी विचारांशी फारकत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडी केली. तरी आम्ही शांत होतो. सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, अजित पवार यांच्याकडे गेले की, आमच्यासाठी निधीची कमतरता असायची. आम्हाला फक्त मुख्यमंत्रीपद होते. बाकी सत्ता ही काँग्रेस-राष्ट्रवादीची होती असेही भुमरे म्हणाले. म्हणूनच मातोश्रीला ‘त्या’ गोचीडांमुळे आज हे दिवस पहावे लागत आहे. मात्र, त्यांनी हे नऊ गोचीड कोण? याबाबत नावे न सांगण्याचे टाळले. वेळ आल्यानंतर ही नावे जाहीर करू, असे  भुमरे यांनी आर्वजून सांगितले.

Web Title: This time came to Matoshree due to 'those' nine people; Criticism by Sandipanrao Bhumre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.