यंदा दसरा गोड होणार, खात्यात दोन हजार येणार
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: October 11, 2023 06:15 PM2023-10-11T18:15:33+5:302023-10-11T18:15:40+5:30
‘नमो’ योजनेचा पहिला हप्ता ; पीएम किसान सन्मानचाही मिळणार १५ वा हप्ता
अमरावती : ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ला राज्य शासनाने मंजूरी दिली आहे व योजनेसाठी पीएम किसान सन्मान योजनेचा डेटा राहणार असल्याचे जिल्ह्यातील २,६४,८६१ शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजारांचा पहिला हप्ता दसऱ्यापूर्वी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय ‘पीएम किसान’चाही १५ हप्ता सोबतच मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची दसरा अन् दिवाळी गोड होणार आहे.
राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविण्यासाठी जून महिनन्यात शासनादेश निगर्मित केला होता. याशिवाय यंदाच्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएम किसान सन्मान योजनेप्रमाणेच राज्यात योजना राबविण्यात येत असल्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी आता होत आहे. वर्षभरात तीन हप्त्यात प्रत्येकी सहा हजार राज्य शासनाचे व अशाच प्रकारे सहा हजार केंद्र शासनाचे म्हणजेच प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपयांचा लाब आता मिळणार आहे.