विभागीय आयुक्त कार्यालयातून चंदन झाडाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:25 PM2018-10-01T22:25:08+5:302018-10-01T22:25:28+5:30
येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या दर्शनी भागातील उद्यानातून रविवारी मध्यरात्री चंदन झाडाची कत्तल करण्यात आली. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक तैनात असताना चंदन वृक्षाची चोरी झाली कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयाचे नाझर राजू पेठे यांनी गाडगेनगर ठाण्यात सोमवारी तक्रार नोंदविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या दर्शनी भागातील उद्यानातून रविवारी मध्यरात्री चंदन झाडाची कत्तल करण्यात आली. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक तैनात असताना चंदन वृक्षाची चोरी झाली कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयाचे नाझर राजू पेठे यांनी गाडगेनगर ठाण्यात सोमवारी तक्रार नोंदविली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयातून अज्ञात चोरट्यांनी चंदन झाडाची चोरीस गेल्याची बाब नमूद केली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्यांनी लंपास केलेले चंदनाचे झाड हे परिपक्व होते. मात्र, अचानक झाड चोरीस गेल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बंगले, निवासस्थान परिसरातून चंदन झाडाची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. चंदनवृक्ष चोरीचे रॅकेट औरंगाबाद, अकोला येथील असल्याची विश्वसनीय माहिती आहे. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हा व सत्र न्यायाधीश, पोलीस अधीक्षक, मुख्य वनसंरक्षक आदी अतिमहत्त्वाच्या अधिकाºयांचे बंगले चंदन तस्करांनी लक्ष्य केले होते. मध्यंतरी पोलिसांनी प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांच्या वसाहती, बंगला परिसरात गस्त वाढविली होती. काही दिवस हा प्रकार थांबला होता. मात्र, पोलिसांनी रात्रची गस्त बंद करताच पुन्हा चंदन चोरटी शहरात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
वनविभागाची जबाबदारी वाढली
अमरावतीत पुन्हा चंदन तस्कर सक्रिय झाल्याच्या पार्श्वभूमिवर पोलिसांसह वन विभागाची जबाबदारी वाढली आहे. चंदनाची झाडे अधिकाºयांच्या वसाहतीत अथवा बंगल्यांमध्ये आहे. चंदनवृक्षांची कत्तल करण्यात तस्कर पटाईत आहेत. त्यांच्याकडे आवाजविरहीत साहित्य असल्यामुळे रात्रीला अवघ्या पाच मिनिटांतच ते झाडांची कत्तल करून मोहीम फत्ते करतात. सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यात धूळफेक करुन तत्क्षण चंदनवृक्ष चोरण्याचा प्रताप करतात.