पवन घोंगडे महाराजच्या भक्तांची कसून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:14 PM2018-06-30T22:14:07+5:302018-06-30T22:14:54+5:30

भोंदूबाबा पवन घोंगडे महाराज कोठे लपून बसला, याचा थांगपत्ता पोलिसांना अद्याप लागलेला नाही. भक्तमंडळी मात्र पवन महाराजच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे. हे पाहता पोलिसांनी आता भक्तमंडळींची कसून चौकशी सुरु केली आहे. शुक्रवारी रहाटगावातील काही भक्तमंडळींना ठाण्यात बोलावून गाडगेनगर पोलिसांनी चौकशी केली.

A thorough investigation of the devotees of Pawan Ghongade Maharaj | पवन घोंगडे महाराजच्या भक्तांची कसून चौकशी

पवन घोंगडे महाराजच्या भक्तांची कसून चौकशी

googlenewsNext
ठळक मुद्देरहाटगावात पोलिसांचे ठाण : रचलेले सापळे अयशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भोंदूबाबा पवन घोंगडे महाराज कोठे लपून बसला, याचा थांगपत्ता पोलिसांना अद्याप लागलेला नाही. भक्तमंडळी मात्र पवन महाराजच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे. हे पाहता पोलिसांनी आता भक्तमंडळींची कसून चौकशी सुरु केली आहे. शुक्रवारी रहाटगावातील काही भक्तमंडळींना ठाण्यात बोलावून गाडगेनगर पोलिसांनी चौकशी केली.
भोंदूबाबा पवनच्या भक्तमंडळीच्या संपर्कात असल्याच्या संशयावर गाडगेनगर पोलिसांनी पवन महाराजच्या कथित भक्तांवर पाळत ठेवली. पवन महाराज रहाटगावातील एक भक्ताचा पाठलाग करून त्याचा मागोवा शुक्रवारी घेतला. ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने रहाटगावात ठाण मांडले होते. मात्र, त्या भक्ताच्या संपर्कात हा पवन महाराज नसल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी रचलेला सापळा अयशस्वी ठरला. पवन महाराजचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत.
पवन महाराजला अभय कुणाचे?
महिन्याभरापासून पसार पवन घोंगडे महाराज लब्धप्रतिष्ठित भक्तांकडे लपल्याची शंका वर्तविली जात आहे. कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या पवन महाराजाला अभय देणारे कोण, त्यांना कायद्याचे भय नाही का, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पवन घोंगडे महाराज भक्तमंडळीच्या संपर्कात असण्याचा संशय असून, त्या अनुषंगाने भक्तमंडळींची चौकशी सुरू आहे. मात्र, अद्यापपर्यंत पवनचा सुगावा लागला नाही.
- मनीष ठाकरे, ठाणेदार, गाडगेनगर

Web Title: A thorough investigation of the devotees of Pawan Ghongade Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.