‘त्या’ मृत वाघिणीची ओळख पटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 04:27 AM2019-03-05T04:27:14+5:302019-03-05T04:27:17+5:30

वन्यजीव दिनी ३ मार्चला आढळून आलेल्या वाघिणीच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. ती वाघीण मेळघाट व्याघ्र प्रकल्पातीलच असून विषबाधेने मृत्यूची शक्यता वर्तविली जात आहे.

'Those' dead tigers were recognized | ‘त्या’ मृत वाघिणीची ओळख पटली

‘त्या’ मृत वाघिणीची ओळख पटली

Next

परतवाडा (अमरावती) : वन्यजीव दिनी ३ मार्चला आढळून आलेल्या वाघिणीच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. ती वाघीण मेळघाट व्याघ्र प्रकल्पातीलच असून विषबाधेने मृत्यूची शक्यता वर्तविली जात आहे.
जितापूर बीटमध्ये आढळून आलेल्या वाघिणीच्या मृतदेहापासून शंभर मीटर अंतरावर जंगली डुक्कर मृतावस्थेत आढळून आले. त्याचे मांस आणि अवयव व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी तब्यात घेतले. डुकरांना मारण्यासाठी स्थानिक गावकरी विषारी उंडे टाकतात. ते खाल्लेल्या डुकराची शिकार करुन त्याचे मांस मटकावल्यानेच वाघिणीची मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. श्वान पथकातील जेनीने मृत वाघीण मृत्यूपूर्वी ज्या पाणवठ्यावर पाणी प्यायली तो पाणवठा व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला.

Web Title: 'Those' dead tigers were recognized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.