‘त्या’ मद्यधुंद कर्मचाऱ्यांचे निलंबन हवे
By Admin | Published: January 1, 2016 12:52 AM2016-01-01T00:52:02+5:302016-01-01T00:52:02+5:30
कृषी विभागाच्या ज्या मद्यधुंद चालक व कर्मचाऱ्यांमुळे अपघात घडला व दोन कुटुंब उद्ध्वस्त झालेत. त्या चालकासह गाडीतील
रोशन कडू ल्ल तिवसा
कृषी विभागाच्या ज्या मद्यधुंद चालक व कर्मचाऱ्यांमुळे अपघात घडला व दोन कुटुंब उद्ध्वस्त झालेत. त्या चालकासह गाडीतील कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी, यासाठी मृतांच्या नातेवाईकांनी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात ठिय्या दिला व पालकमंत्री ना. प्रवीण पोटे यांची भेट घेऊन मागणी केली.
या अपघातास कारणीभूत असणाऱ्या चालकासह गाडीत उपस्थित कर्मचारी यांचे निलंबन तत्काळ करण्यात यावे, या मागणीसाठी मृत रणजित केने यांचे चुलत सासरे व माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास रहाटे, साऊरचे ग्रामपंचायत सदस्य अतुल भामोदकर, प्रदीप गौरखेडे यांच्यासहीत नातेवाईकांनी गुरूवारी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात अपघातास जबाबदार कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे या मागणीसाठी ठिय्या दिला. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक अनुपस्थित असल्याने कृषी अधीक्षक विजय चवाळे यांच्याशी चर्चा केली. चवाळे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुडे यांच्यासी चर्चा करून कारवाईचे प्रस्ताव मागविले. दरम्यान आ.यशोमती ठाकूर व मृतांच्या नातेवाईकांनी ना.पोटे यांची भेट घेतली असता त्यांनी दोषी कर्मचाऱ्यावर कारवाईचे आदेश दिलेत.
तिवसा पोलिसांनी दाखल एफआयआर, पंचनामा व बयान आधारे चालक सुखदेव गोडबोले व भांडार लिपिक चंद्रकांत वानखडे यांच्या कारवाईचा प्रस्ताव विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाला पाठविण्यात आला आहे.
- दत्तात्रय मुडे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. चालक सुखदेव गोडबोले यांच्याविरुद्ध निलंबनाचा प्रस्ताव आलेला आहे. यावर कारवाई करण्यात येणार आहे.
- विजय चवाळे,
कृषी अधीक्षक,
विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय.