शेकडोंना फसवून ठगबाज पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:10 AM2017-10-12T00:10:38+5:302017-10-12T00:11:16+5:30

Thousands of deceased people cheated | शेकडोंना फसवून ठगबाज पसार

शेकडोंना फसवून ठगबाज पसार

Next
ठळक मुद्देकोतवालीत गुन्हा दाखल : सेवाभावी संस्थेकडून वाहन कर्ज देण्याचे आमिष

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : हरियाणातील जैन धर्माच्या संस्थांकडून वाहन कर्ज उपलब्ध करून देणाचे आमीष दाखवून कनकराज जैन नामक तरुणाने अमरावतीतील शेकडो जणांची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला. याची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पोलिसांनी कनकराज जैनविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
मागील सहा महिन्यांपासून वसंत टॉकीजजवळील इंद्रपुरी लॉजमध्ये राहून कनकराज जैन याने भाजीबाजारातील जैन मंदिरात ये-जा करीत होता. दरम्यान त्याने तेथील स्वच्छता कर्मचारी सुधिर उकेसोबत ओळख केली. त्याच्या माध्यमातून त्याने मंदिरात येणाºया नागरिकांशी परिचय करून घेतला.
अहिंसेच्या नावे फसवणूक
त्याने तेथील नागरिकांना हरियाणा येथील जैन सेवाभावी संस्थेतून गरजू व्यक्तींना आर्थिक मदत देण्याचे आमिष दाखविले. अंहिसा आर्थिक योजनेतून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने सर्वप्रथम पुजारींना २० हजारात दुचाकी वाहने देऊन विश्वासात घेतले. त्यामुळे पुजाºयानेही कनरराजने सांगितलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेकांना आमंत्रण दिले. त्यानुसार अनेक जण कनकराजसोबत जुळायला लागले. २ हजार २०० रुपये भरले की २ लाखांचे कर्ज, ५ हजार भरले की ५ लाखांचे कर्ज तसेच वाहन हवे असेल तर २० हजार रुपये भरा आणि दुचाकी घ्या इतकेच नव्हे तर ८० हजार रुपये भरून ट्रॅक्टर देण्याचे आमिष कनकराज जैन याने नागरिकांना दाखविले. त्यानुसार अनेकांनी कनकराजजवळ पैसे जमा करण्यास सुरुवात केली. त्यानुसार काही जणांना वाहन सुध्दा दिले. मात्र, ज्यांना पैसे भरूनही वाहने मिळाली नाहीत, त्यांना कनकराजने रेल्वेस्थानक रोडवरील एका दुचाकीच्या शोरूममध्ये सुध्दा नेले. त्या ठिकाणी दुचाकी बुकिंग केल्याचे सांगून फोटोसेशन सुध्दा केले. हा प्रकार सुरु असताना कनकराजने याने थोडा वेळ थांबण्याचे सांगून तेथून पळ काढला.
नागरिकांनी कनकराजची काही वेळ प्रतीक्षा केली. मात्र, तो परत आला नसल्याचे पाहून आपली फसवणूक झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे १५ ते २० नागरिकांनी इंद्रपुरी हॉटेलमध्ये जाऊन कनकराजचा शोध घेतला. त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला. परंतु, त्याचेशी संपर्क होऊ शकला नाही. या प्रकाराची तक्रार पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे करण्यात आली. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार कोतवाली पोलिसांनी कनकराजविरुध्द फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. या फसवणूक प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

Web Title: Thousands of deceased people cheated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.