तुमच्या वाहनावर हजारोंचा दंड तर नाही ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:16 AM2021-08-25T04:16:45+5:302021-08-25T04:16:45+5:30
असाईनमेंट पान ४ अमरावती : वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यासाठी ई-चालान पद्धती सुरू करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीने वाहतुकीचे नियम ...
असाईनमेंट पान ४
अमरावती : वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यासाठी ई-चालान पद्धती सुरू करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीने वाहतुकीचे नियम मोडले, तर अशा व्यक्तींवर ई-चालान फाडण्यात येते. वाहनधारकांच्या वाहनांची तपासणी करून त्यांच्यावर दंडही आकारला जातो. ई-चालान पद्धतीने दंडाची ही रक्कम थेट शासनाच्या तिजोरीत जमा होते. याशिवाय किती रुपयांचा दंड आकारला गेला, याची माहिती तात्काळ मिळते. याशिवाय ज्या वाहनचालकांनी दंड भरला नाही, अशांवर अनपेड चालान आकारले जाते.
शहरात ते प्रमाण नगण्य आहे. मात्र, अनेक वाहनचालकांना याची माहिती मोबाईल नंबर बदलल्याने दंड झाल्यानंतरच माहिती पडते. यामुळे पुढील काळात वाहनचालकांना सतर्क राहावे लागणार आहे.
अनपेड चालानचा बडगा
नियमांचे उल्लंघन करणारे अनेक जण पोलिसांशी हुज्जत घालतात. अशावेळी काही जण दंडाची रक्कम देत नाही. त्यांच्यावर अनपेड चालानचा बडगा उगारला जातो. पुढील वेळेस हे वाहन नजरेस येताच दोनही वेळचा दंड भरावा लागतो. त्याने दंड न भरल्यास त्याचे वाहन थेट पोलीस जमा होते.
कसे फाडले जाते ई-चालान
नियमांचे उल्लंघन करणारा वाहनचालक दिसताच वाहतूक पोलीस अशा वाहनधारकांना रोखतात. त्याच्याकडे कागदपत्रांची तपासणी करतात. यानंतर ई-चलान फाडले जाते. ई-चालान फाडताना एखाद्या व्यक्तीकडे पैसे नसेल किंवा असा व्यक्ती अधिक हुज्जत घालत असेल, तर अशा व्यक्तीचे चालान अनपेड चालान म्हणून नोंदविले जाते. ही व्यक्ती पुढे जेव्हा वाहन घेऊन सापडतो त्यावेळी गाडीचा नंबर लिहिताच अनपेड चालान दिसते.
मोबाईल अपडेट केला आहे का?
फाडलेले ई-चालान संबंधित व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर पाठविले जाते. या व्यक्तीने आपला मोबाईल नंबर बदलला, तर त्याला या चालानबद्दल माहितीच नसते. यामुळे व्यक्तींनी आपला मोबाईल नंबर वारंवार अपडेट करणे महागात पडते. यामुळे एकाच वेळी फार मोठ्या दंडाची रक्कम भरावी लागते.
दंड झालेल्या वाहनांकडून पूर्ण वसुली
वाहतूक शाखा दंड झालेल्या वाहनधारकांकडून तात्काळ दंड वसूल करते. काही मोजक्याच प्रकरणात अनपेड चालान फाडले जाते. मात्र, शहरात असे प्रमाण फार कमी आहे. दंडाची वसुली झाली नाही, असे फारसे घडत नाही.
विजय कुरळकर, वाहतूक पोलीस निरीक्षक
//////////
ई चालानद्वारे झालेला दंड
२०२१ : वसूल दंड : ८५, २३,२००