हजारो मराठ्यांची मुंबईकडे कू च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 11:31 PM2017-08-08T23:31:02+5:302017-08-08T23:32:18+5:30
सकल मराठा समाजाच्यावतीने ९ आॅगस्ट या क्रांतीदिनी मुंबई येथे आझाद मैदानावर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सकल मराठा समाजाच्यावतीने ९ आॅगस्ट या क्रांतीदिनी मुंबई येथे आझाद मैदानावर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्हाभरातून हजारो मराठ्यांनी मंगळवारी मुंबईकडे कूच केली. ‘मी मराठा, लाख मराठा’, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ - जय शिवराय, ‘रक्ता रक्तात भिनलयं काय, जय जिजाऊ- जय शिवराय’ या गगनभेदी नाºयांनी आसमंत दणाणून गेला होता.
मुंबईत मराठा समाजाचा विशाल मोर्चा निघणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा मंगळवारी सकाळपासून सजग होती. मुंबईकडे जाणाºया मोर्चेकरांची वाहने, मराठा समाज बांधवांची संख्या, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने यावर गोपनीय विभाग लक्ष ठेवून होता. दुसरीकडे मोर्चेकरांसाठी ठिकठिकाणी पाणी, चहा, नास्ता वाटपाचा कार्यक्रमही राष्ट्रीय, राज्य महामार्गावर मोर्चा नियोजकांनी केले होते. बडनेरा रेल्वे स्थानकावरून हावडा-मुंबई गितांजली एक्सप्रेसने मराठा समाज बांधव मुंबईच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघाल्याची नोंद रेल्वे सुरक्षा दलाने केली आहे.
काही मराठा बांधवांनी सोमवारी खासगी वाहने, रेल्वे, ट्रॅव्हल्सने मुंबईकडे ेकूच केली. बडनेरा रेल्वे स्थानकावर मंगळवारी सायंकाळी ५ वाजता हावडा-कुर्ला शालीमार एक्सप्रेसला जिल्ह्यातील मराठा मोर्चेकरांसाठी दोन विशेष कोच लावण्यात आलेत. ही सुविधा खा.आनंदराव अडसूळ यांच्या पुढाकाराने केल्याची माहिती नियोजकांनी दिली. धामणगावातून मराठा समाज मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्याची नोंद झाली आहे. गोंदिया- मुंबई विदर्भ एक्सप्रेस, हावडा-मुंबई मेल, अमरावती-मुंबई एक्सप्रेस, नागपूर-दादर एक्सप्रेसनेही मराठा समाज बांधव मुंबईकडे रवाना झालेत. मोर्चात युवक, युवती, महिलांची मोठी गर्दी असल्याचे पोलीस विभागाने शासनाला कळविले आहे.
मोर्चेकरांसाठी चोख सुरक्षा व्यवस्था
मुंबई येथे मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी जाणाºया मराठा समाज बांधवांच्या चोख सुरक्षा व्यवस्थेसाठी बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी, कर्मचारी तैणात होते. कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी गोपनीय यंत्रणादेखील सज्ज करण्यात आली आहे.
रेल्वेत दोन स्वतंत्र कोच
जिल्हातील मराठा मोर्चेकरांसाठी हावडा-कुर्ला शालीमार एक्सप्रेसमध्ये स्वंतत्र दोन कोच लावल्यामुळे मोर्चेकरांना दिलासा मिळाला. या कोचला अमरावती जिल्हा मराठा मोर्चा, असे बॅनर लावले होते. रेल्वे गाड्यांत स्वतंत्र कोचची व्यवस्था केल्यामुळे मुंबईकडे जाताना होणारी गैरसोय दूर झाली. मराठा बांधव रेल्वेंनीच मोर्चात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत.