अटल दौड हाफ मॅरेथॉन राज्यस्तरीय स्पर्धेत धावले हजारो धावपटू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2023 11:14 AM2023-12-25T11:14:12+5:302023-12-25T11:14:21+5:30

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती

Thousands of runners ran in Atal Daud Half Marathon state level competition | अटल दौड हाफ मॅरेथॉन राज्यस्तरीय स्पर्धेत धावले हजारो धावपटू

अटल दौड हाफ मॅरेथॉन राज्यस्तरीय स्पर्धेत धावले हजारो धावपटू

- मनीष तसरे 

अमरावती: भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने सोमवारी सकाळी अमरावती शहरात गुरुकुल बहुउद्देशीय शिक्षण संस्था व अमरावती जिल्हा अथलेटिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय हाप  मॅरेथॉन स्पर्धाच आयोजन करण्यात आले होते.सकाळी 5:45 वा या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली त्यावेळी हजारो स्पर्धक आज अमरावतीच्या रस्तावरुन धावले.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शहरातील नेहरू मैदानावरून या स्पर्धेला सकाळी पावणे सहा वाजता सुरुवात झाली. राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल स्पर्धेचे उद्घाटन आ प्रवीण पोटे , खा डॉ अनिल बोंडे , आ प्रताप अडसड , किरण पातूरकर , रवी खांडेकर , सौ निवेदिता चौधरी , सौ किरण महल्ले , जयंत डेहनकर , शिवराय कुलकर्णी , डॉ नितीन धांडे , रवी कोल्हे सह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवीत  सुरुवात झाली.

राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल दौड स्पर्धा नेहरू मैदान येथून प्रारंभ होऊन राजकमल चौक , राजापेठ , कल्याण नगर , मोती नगर , राजेंद्र कॉलनी , कॉग्रेस नगर , हॅलो कॉर्नर जिल्हाधिकारी कार्यालय , पंचवटी चौक , शेगाव नाका , विलास नगर , जुना कॉटन मार्केट , जयस्तंभ , जवाहर गेट , गांधी चौक , गौरक्षण चौक , भूतेश्वर चौक , रवीनगर , नवाथे चौक , राजापेठ , राजकमल आणि समारोप नेहरू मैदान होणार आहे .हि स्पर्धा १४,१६,२०,४० व खुल्या वर्गासाठी घेण्यात आल्यात. 

राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल दौड स्पर्धा नेहरू मैदान येथून प्रारंभ होऊन राजकमल चौक , राजापेठ , कल्याण नगर , मोती नगर , राजेंद्र कॉलनी , कॉग्रेस नगर , हॅलो कॉर्नर जिल्हाधिकारी कार्यालय , पंचवटी चौक , शेगाव नाका , विलास नगर , जुना कॉटन मार्केट , जयस्तंभ , जवाहर गेट , गांधी चौक , गौरक्षण चौक , भूतेश्वर चौक , रवीनगर , नवाथे चौक , राजापेठ , राजकमल आणि समारोप नेहरू मैदान मध्ये करण्यात आला.

Web Title: Thousands of runners ran in Atal Daud Half Marathon state level competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.