अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या प्रमुखाला चाकू मारण्याची धमकी

By admin | Published: September 10, 2015 12:05 AM2015-09-10T00:05:02+5:302015-09-10T00:05:02+5:30

राजापेठ पोलीस ठाण्यानजीकच्या महापालिका गोदाम परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविताना पथकाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे यांना बुधवारी सकाळी एका अतिक्रमणधारकाने चाकू मारण्याची धमकी दिली.

The threat of killing a knife in the head of the Encroachment Eradication Team | अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या प्रमुखाला चाकू मारण्याची धमकी

अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या प्रमुखाला चाकू मारण्याची धमकी

Next

अतिक्रमणधारकांची मुजोरी : राजापेठ परिसरात सुरु होती कारवाई
अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्यानजीकच्या महापालिका गोदाम परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविताना पथकाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे यांना बुधवारी सकाळी एका अतिक्रमणधारकाने चाकू मारण्याची धमकी दिली. राजापेठ परिसरातील अतिक्रमणातील हातगाड्यांवर कारवाई केल्यानंतर एका अतिक्रमणधारकाने हा प्रकार केला.
काही दिवसांपूर्वीच रेल्वे स्थानक परिसरात अतिक्रमण हटविताना महापालिकेच्या कर्मचाऱ्याला चाकू मारण्यात आला. हा वाद शांत होत नाही तोच अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनाच थेट चाकू मारण्याची धमकी अतिक्रमणधारकाने दिली आहे.
पोलीस संरक्षणात अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू आहे. मात्र, तरीही मोहिमेला प्रचंड विरोध होत असल्याचे चित्र आहे. बुधवारी गणेश कुत्तरमारे यांनी राजापेठ परिसरातील अतिक्रमण हटविणे सुरु केले. यावेळी त्यांनी काही हातगाड्या जप्त केल्या. त्या हातगाड्या राजापेठ पोलीस ठाण्याच्या बाजुला असणाऱ्या महापालिका गोदामात ठेवण्यात येत होत्या. याच दरम्यान आरोपी मोहम्मद सोहेब मोहम्मद हुसेन(२०,रा. भाजीबाजार),शेख निसार शेख मेहबूब (२५,रा. हैदरपुरा), जमीर भाई नासिर भाई (२७,रा कलीमनगर) व शेख निसार शेख फारूख (२१,रा. अकबरनगर) यांनी कुत्तरमारे यांच्याशी वाद घातला. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून 'तुमको चाकुसे मारना पडेगा' अशी धमकी दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. कुत्तरमारे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून पोलिसांनी भादंविच्या कलम ३५३, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून मा. सोहेब मो. हुसेन व शेख निसार शेख मेहबूब यांना अटक केली तर दोन आरोपी पसार झाले. (प्रतिनिधी)
शहरात अतिक्रमण हटाव मोहीम
महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशाने बुधवारी शहरातील जवाहर गेट ते ईस्माइल कटपीस, परकोटा शेजारील व रेल्वे स्थानक चौक परिसरातील अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये ३५ हातगाड्या, २ पानटपऱ्या व गाड्या चढविण्याचे हायड्रोलिक स्टॅन्ड जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत ७ ट्रक माल महापालिकेने जप्त केला आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक खराते, उमेश सवई, पोलीस कर्मचारी व अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

Web Title: The threat of killing a knife in the head of the Encroachment Eradication Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.