वसुलीकरिता महिलांना धमकी
By admin | Published: July 1, 2017 12:17 AM2017-07-01T00:17:43+5:302017-07-01T00:17:43+5:30
घेतलेल्या कर्जाचा चुकारा केला नाही तर घरातील सामान जप्त करण्यात येईल...
पोलीस ठाण्यात तक्रार : अदखलपात्र गुन्हा दाखल
शेंदूरजनाघाट : घेतलेल्या कर्जाचा चुकारा केला नाही तर घरातील सामान जप्त करण्यात येईल व त्याचा लिलाव करून वसुली करण्याची धमकी एका मायक्रोफायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी महिलांना दिल्याने त्यांनी पोलिसात दाद मागितली आहे.
या प्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. प्राप्त माहितीनुसार, महिला सक्षमीकरणाच्या नावावर एका कंपनीने महिलांना कर्ज दिले. मात्र आता वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. काही महिलांनी व्याजासकट कर्ज चुकविले. मात्र, त्यांना कोणतिही पावती देण्यात आली नाही. महिलांनी पावतीची मागणी केल्यावर त्यांना दमदाटी करण्यात आली. यासंदर्भात आ. अनिल बोंडे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी शेंदुरजनाघाटचे ठाणेदार शेषराव नितनवरे यांनी मायक्रोफायनान्स कंपनीचे कर्मचारी यांच्यावर वसुली, धमकावणे, शिवीगाळ करण्याबाबत भादविचे ५०६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. यासाठी स्थानिक नगरसेविकेने पुढाकार घेतला होता.