तीन आरोपींजवळून ३६ तितर-बटेर ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:39 AM2018-04-25T01:39:37+5:302018-04-25T01:39:37+5:30
नागपूर-औरंगाबाद मार्गातील देवगाव येथे तितर-बटेर खरेदी करीत असताना वनविभागाने कार्स संघटनेच्या मदतीने केलेल्या कारवाईत तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ३६ जिवंत तितर-बटेर, ससे व दोन कार जप्त केल्या.
धामणगाव रेल्वे : नागपूर-औरंगाबाद मार्गातील देवगाव येथे तितर-बटेर खरेदी करीत असताना वनविभागाने कार्स संघटनेच्या मदतीने केलेल्या कारवाईत तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ३६ जिवंत तितर-बटेर, ससे व दोन कार जप्त केल्या.
चांदूर रेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.ए.कोकाटे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली. भद्रावतीहून अकोला येथे निघालेल्या एमएच ३४ डीएफ २८९८ या कारमधून दोन तितर खरेदी करून जात असताना चालक विकी मालवटकर (३०), हिंगणघाट येथून शेगावला एमएच ३२ एएच १६५० क्रमांकाच्या कारने निघालेल्या प्रवीण गुणवंत चिकटवार (४४) याला दोन जिवंत बटेरसह अटक केली़ विक्री करणारा पतीराज काळे (६५, देवगाव) याला ताब्यात घेऊन ३६ तितर व चार बटेर, दोन जिवंत ससे जप्त केले़ कार्सचे चेतन भरती, आकाश रामटेके, अक्षय तांबटकर, ऋषीकेश देशमुख यांनी सहकार्य केले. हिंगणघाट येथील एका पोलिसाचा खरेदीदारात समावेश असल्याचे संशय आहे.