तिघे बाल सुधारगृहात, तीन आरोपींना ३० ऑगस्टपर्यंत कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:15 AM2021-08-29T04:15:47+5:302021-08-29T04:15:47+5:30
तिवसा : बहिणीच्या प्रियकराची हत्या केल्याच्या आमला विश्वेश्वर येथील घटनेत तीन अल्पवयीनांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली, तर तिघांना ...
तिवसा : बहिणीच्या प्रियकराची हत्या केल्याच्या आमला विश्वेश्वर येथील घटनेत तीन अल्पवयीनांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली, तर तिघांना ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
‘सैराट’ चित्रपटाच्या कथानकाला शोभणारा थरार कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमला विश्वेश्वऱ (ता. चांदूर रेल्वे) गावात गुरुवारी रात्री घडला. अल्पवयीन बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून अवघ्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने मित्राच्या मदतीने अक्षय ऊर्फ गुणवंत दिलीप अमदुरे (२२, रा. चांदूर रेल्वे) या तिच्या प्रियकराची हत्या केली. या प्रकरणातील तीन आरोपींना शनिवारी चांदूर रेल्वे येथील न्यायालयात हजर केले असता, त्यांना ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. अजय सुरेश धडांंगे (२२), प्रवीण नारायण बकाले (३४) व मयूर भीमराव सहारे (२२, तिघेही रा. आमला विश्वेश्वर) यांचा यात समावेश आहे. अल्पवयीन तिघांची शुक्रवारी उशिरा बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून चाकूसह दुचाकी जप्त केल्या असून, या प्रकरणाची सखोल चौकशी कुऱ्हा पोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे करीत आहेत.