पश्चिम विदर्भातील तीन मोठे प्रकल्प शंभर टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:12 PM2019-09-19T12:12:02+5:302019-09-19T12:13:19+5:30

गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. पश्चिम विदर्भातील तीन मोठे प्रकल्प शंभर टक्के भरल्याची नोंद जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

Three big projects in West Vidarbha filled 100 per cent | पश्चिम विदर्भातील तीन मोठे प्रकल्प शंभर टक्के भरले

पश्चिम विदर्भातील तीन मोठे प्रकल्प शंभर टक्के भरले

Next
ठळक मुद्देचार प्रकल्पांचे दरवाजे उघडले पाण्याचा विसर्ग सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. पश्चिम विदर्भातील तीन मोठे प्रकल्प शंभर टक्के भरल्याची नोंद जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारा अप्पर वर्धा धरण गेल्या आठवड्यातच शंभर टक्के भरले होते. पूर्वी धरणाचे तीन दरवाजे उघड्यात आले होते. आता मंगळवारपासून १० सेंमीने पाच दरवाजे उघडण्यात आले असून, वर्धा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाचा मानला जाणारा बेंबळा हा मोठा प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. या प्रकल्पाचे १० सेंमीने दोन दरवाजे उघडण्यात आले असून, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पसुद्धा शंभर टक्के भरला असून, १० सेंमीने दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पात ९८.२३ टक्के पाणीसाठा साचल्यामुळे १० सेंमीने दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत जलसंपदा विभागाने घेतलेल्या पाणीसाठ्याच्या नोंदीनुसार चार प्रकल्पांचे गेट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सुद्धा सतर्क करण्यात आले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ४५.०३ टक्के पाणीसाठा साचला आहे. अरुणावती प्रकल्पात सर्वात कमी १३.३४ टक्के पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्यतील काटेपूर्णा प्रकल्पात फक्त २४.३० टक्के पाणीसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यात मागील वर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. पेनटाकळी प्रकल्पात चांगला पाणीसाठा साचला असला तरी नळगंगा प्रकल्पात ३८.४९ टक्के पाणीसाठा आहे. खडकपूर्णा प्रकल्प शुन्य टक्यांवरून आता ५.१६ टक्क्यांवर गेला आहे. एकूण नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ७१.८२ टक्के पाणीसाठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी ७०.१९ टक्के पाणीसाठा आहे. ४६९ प्रकल्पांत सरासरी ४९.९५ टक्के पाणीसठा साचला असून मध्यम, मोठे व लघु अशा एकूण ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ६३.९१ टक्के पाणीसाठा साचला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पाच मध्यम प्रकल्प शंभर टक्के
यंदा पाच मध्यम प्रकल्पांत शंभर टक्के पाणीसाठा साचला आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा, नवरगांव, बुलडाणा जिल्ह्यतील ज्ञानगंगा, मस, पलढग प्रकल्पांचा समावेश आहे, तर अमरावती जिल्ह्यातील शहानूर मध्यम प्रकल्पात सद्यस्थितीत ९५.७४ टक्के पाणीसाठा आहे. पाच सेंमीने चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. चंद्रभागा प्रकल्पात ९५.४७ टक्के पाणीसाठा असून, १० सेंमीने दोन दरवाजे उघडण्यात आले. पूर्णा ९१.८९ टक्के १५ सेमींने दोन दरवाजे उघडले आहेत. सपन प्रकल्पात ९६.२७ टक्के पाच सेंमीने चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. यवतमाळमधील बोरंगाव ९७.४३ टक्के, बुलडाणामधील तोरणा ९८.१० टक्के सदर प्रकल्प शंभर टक्याच्या वाटेवर आहेत.

Web Title: Three big projects in West Vidarbha filled 100 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी