लोकशाही दिनात तीन प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2016 12:14 AM2016-01-05T00:14:59+5:302016-01-05T00:14:59+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांच्या उपस्थितीत...
२० निवेदने प्राप्त : सर्वाधिक पुनर्वसन विभागाची प्रकरणे
अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांच्या उपस्थितीत लोकशाही दिनाचे कामकाज पार पडले. जिल्हा लोकशाही दिनात ८ प्रलंबित प्रकरणांपैकी ३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये महसूल विभागाचे २, जिल्हा परिषद १, निकाली काढण्यात आले. तर ५ प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली.
जिल्हा लोकशाही दिनाच्या कामकाजासाठी विविध विभागाशी संबंधित नागरिकांनी २० निवेदने दाखल केली.
तसेच ४२ निवेदने पुरग्रस्त व पुर्नवसन विभागाशी संबंधित असून सदर निवेदन संबंधित अधिकारी (पुर्नवसन) यांच्याकडे आवश्यक त्या कार्यवाहीकरीता हस्तांतरीत करण्यात आली.
प्राप्त झालेल्या निवेदनावर चर्चा करण्यात येऊन संबंधित कार्यालय प्रमुखांनी सदर निवेदने निकाली काढण्यासाठी कार्यवाही करावी तसेच प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची प्रक्रिया गतीमान करावी, असे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. लोकशाही दिनाच्या कामकाजासाठी संबंधित विभागाचे जिल्हाप्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)