डीपीसीचा तीन टक्के निधी महिला, बालविकास योजनांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:14 AM2021-06-09T04:14:54+5:302021-06-09T04:14:54+5:30

अमरावती : जिल्हा नियोजन निधीत महिला व बालविकास योजनांसाठी तीन टक्के राखीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून ...

Three per cent of DPC funds for women, child development schemes | डीपीसीचा तीन टक्के निधी महिला, बालविकास योजनांसाठी

डीपीसीचा तीन टक्के निधी महिला, बालविकास योजनांसाठी

Next

अमरावती : जिल्हा नियोजन निधीत महिला व बालविकास योजनांसाठी तीन टक्के राखीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून अंगणवाडी सुधारणांसह विविध उपक्रमांना चालना देण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अतुल भंडागे, राजश्री कोलखेडे आदी यावेळी उपस्थित होते.

महिला व बालविकासाच्या विविध योजनांना चालना मिळण्यासाठी जिल्हा नियोजनातील ३ टक्के निधीची तरतूद करण्यात आली. त्यानुसार यंदाच्या ३०० कोटींच्या जिल्हा नियोजनात ९ कोटी रुपयांचा निधी राखीव राहील. त्यानुसार अंगणवाडी इमारत सुधारणा, सुशोभीकरण, कुंपण भिंती आदी कामांना चालना देण्याचा प्रयत्न आहे. अंगणवाड्यांना पेयजल सुविधा, स्वच्छतालये, इतर आवश्यक उपकरणे, ई-लर्निंग सुविधा आदींबाबत विभागाने परिपूर्ण नियोजन करून त्यानुसार कामे राबवावीत. महिला व बालविकास भवन उभारण्यासाठीची निविदा प्रक्रिया गतीने राबवावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

बॉक्स

अंगणवाड्यांत सौरऊर्जा दिवा प्रणाली

जिल्ह्यातील ५९५ अंगणवाड्यांमध्ये सौर घरगुती दिवा प्रणाली आस्थापित व कार्यान्वित करण्याच्या कार्यक्रमाला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली. इमारतींच्या सुरक्षिततेसाठी कुंपण आदी सुविधाही उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यात वर्किंग वुमेन होस्टेल व इतरही बाबींसाठी निधी देऊन आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येतील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Three per cent of DPC funds for women, child development schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.