न्यायाधीशाच्या निवासस्थानी मसण्याऊद मादीसह तीन पिलांचे वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:16 AM2021-09-07T04:16:48+5:302021-09-07T04:16:48+5:30
अमरावती : जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश भाग्यश्री कडुस्कर यांच्या शासकीय निवासस्थानी रविवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास मसण्याऊद मादीसह तीन ...
अमरावती : जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश भाग्यश्री कडुस्कर यांच्या शासकीय निवासस्थानी रविवारी
रात्री ७ वाजेच्या सुमारास मसण्याऊद मादीसह तीन पिलांचे वास्तव्य असल्याची बाब निदर्शनास आली. वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने या चारही मसण्याऊद यांना सुरक्षितपणे रेस्क्यू करून नजीकच्या पोहरा जंगलात सोडण्यात आले.
न्यायमूर्ती भाग्यश्री कडुस्कर यांचे शासकीय निवासस्थान, जान्हवी बंगल्यातील किचनमधे एक मसण्याऊद मादी व तीन पिले आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर बंगल्यावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या रक्षकांनी ही बाब न्यायमूर्ती कडुस्कर यांना सांगितली. काही वेळेनंतर वन विभागाची रेस्क्यू चमू घटनास्थळी दाखल झाली. अमरावती वन विभागाच्या रेस्क्यू टीमने मोक्यावर जाऊन चार मसण्याऊद रेस्क्यू करून पोहरा जंगलात सोडून दिले. ही कार्यवाही वन विभाग रेस्क्यू टीममधील वनरक्षक अमोल गावनेर, मनोज माहूलकर व आसीफ पठाण यांनी केली.
--------------
उंदीर नव्हे तर मसण्याऊद निघाल
न्यायमूर्ती कडुस्कर यांच्या निवासस्थानी किचनमध्ये उंदरासारखी काही पिले आढळून आल्याने ते उंदीर असावे, अशी शंका त्यांना आली. मात्र, उंदरापेक्षा मोठ्या प्रकारचे प्राणी असल्याने काही तरी वेगळे
असल्याचा त्यांना भास झाला. त्यानंतर वन विभागाच्या चमूला पाचारण केले असता वनरक्षक अमोल गावनेर यांनी बघताच ते उंदीर नव्हे तर मसण्याऊद असल्याचे न्यायमूर्ती भाग्यश्री कडुस्कार यांना सांगितले. किचनमध्ये मसण्याऊद मादीने तीन पिल्यांना जन्म दिला असावा, असा अंदाज रेस्क्यू चमूचे अमोल गावनेर यांनी व्यक्त केला आहे.