धामणगाव बाजार समितीत तीन कोटींचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 11:48 AM2019-07-06T11:48:10+5:302019-07-06T11:50:07+5:30

शेतकऱ्यांना शेतमाल तारण कर्ज न देता स्वत: वापरणे, प्रवास भत्त्याची अधिक उचल, शेतकऱ्यांच्या भोजनालयावर अव्वाच्या सव्वा खर्च दाखविणे याप्रकारे एकूण २ कोटी ९९ लाख रुपयांचा अपहार धामणगाव रेल्वे येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत उघड झाला आहे.

Three Crores fraud in Dhamangaon Market Committee | धामणगाव बाजार समितीत तीन कोटींचा अपहार

धामणगाव बाजार समितीत तीन कोटींचा अपहार

Next
ठळक मुद्देलेखापरीक्षणात ठपकासभापती, संचालकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शेतकऱ्यांना शेतमाल तारण कर्ज न देता स्वत: वापरणे, प्रवास भत्त्याची अधिक उचल, शेतकऱ्यांच्या भोजनालयावर अव्वाच्या सव्वा खर्च दाखविणे याप्रकारे एकूण २ कोटी ९९ लाख रुपयांचा अपहार धामणगाव रेल्वे येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत उघड झाला आहे. याप्रकरणी जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी बाजार समिती सभापती व संचालक मंडळाविरुद्ध शुक्रवारी धामणगावातील दत्तापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या फौजदारी प्रकरणाने सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
धामणगाव बाजार समितीच्या सन २०१७-१८ चे लेखापरीक्षण अहवालातून हा गैरव्यवहार तथा अफरातफर उघड झाली. जिल्हा विशेष लेखापरीक्षक अशोक माकोडे यांनी अहवालाअंती पोलीस तक्रार दाखल केली. शेतमाल तारण कर्ज शेतकºयांसाठी असताना ते संचालक मंडळ व इतर शेतकºयांच्या नावाने दाखवून २ कोटी ८२ लाख रुपयांच्या तारण कर्जाची अफरातफर केली आहे. सभापतींनी १ लाख २४ हजार रुपयांचा प्रवासभत्ता दाखवून गैरव्यवहार केल्याचा ठपका लेखापरीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे. शेतकºयांसाठी असलेले भोजनालय अनधिकृतरीत्या चालवून २ लाख १५ हजार रुपयांचा खर्च दाखविण्यात आला.

सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालातून २ कोटी ९९ लाख रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी सभापती, सचिव व सर्व संचालक मंडळाच्या विरोधात वरिष्ठांंच्या आदेशानुसार दत्तापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
- अशोक माकोडे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक

धामणगाव बाजार समितीच्या सभापती, सचिव व सर्व संचालक मंडळाविरुद्ध जिल्हा विशेष लेखापरीक्षक अशोक माकोडे यांनी तक्रार दिली आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांकडे विचारणा करण्यात येईल. अद्याप चौकशी सुरू असून, गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही.
- रवींद्र सोनवणे, पोलीस निरीक्षक, दत्तापूर

Web Title: Three Crores fraud in Dhamangaon Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.