साफसफाईवर महिन्याला तीन कोटी खर्च; मग या घाणीला जबाबदार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 12:17 PM2024-08-12T12:17:06+5:302024-08-12T12:17:30+5:30

Amravati : ना नाल्या निघे, न नाल्यातील गाळ, रस्त्याशेजारी गार्बेज कलेक्शन

Three crores per month spent on cleaning; So who is responsible for this mess? | साफसफाईवर महिन्याला तीन कोटी खर्च; मग या घाणीला जबाबदार कोण?

Three crores per month spent on cleaning; So who is responsible for this mess?

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
सुमारे दहा लाख अमरावतीकरांचे प्रतिनिधित्व करणारी महापालिका शहर स्वच्छतेवर महिन्याकाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च करते. शहरातून दैनंदिन निघणारा कचरा व हॉटेल वेस्टदेखील सुकळी कंपोस्ट डेपोत नेऊन टाकणे बंधनकारक आहे. त्यासाठी महापालिका आस्थापनेवर सुमारे ६५० च्या आसपास सफाई कामगारांसह कंत्राटदारांचे देखील कामगार आहेत. तरीदेखील शहरातील अनेक रस्ते गार्बेज कलेक्शन सेंटर बनले आहेत. दैनंदिन कचरा संकलन व स्वच्छतेसाठी झोननिहाय पाच कंत्राटदार नेमले गेले आहेत. त्यांच्या वतीने शहरात घंटागाडीद्वारे कचरा संकलन केले जाते. 

कशासाठी किती खर्च
कचरा संकलन :
झोननिहाय पाच कंत्राटदारांवर महिन्याकाठी एकूण दोन ते २.२५ कोटी रुपये खर्च केले जातात.
कचरा प्रक्रिया: सुकळी व अकोली रोड येथे कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यावर देखील खर्च होतो.
कचरा वाहतूक : शहरातून दैनंदिन संकलित होणारा कचरा सुकळी कंपोस्ट डेपोत नेला जातो.


साफसफाईवर पालिकेचा महिन्याला तीन कोटींचा खर्च 
महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून शहर स्वच्छतेवर दर महिन्याला सुमारे तीन ते सव्वातीन कोटी रुपये खर्च होतो.


रस्त्यांवरही घाण
शहरातील अनेक रस्त्यांवर, रस्त्यांशेजारी कचऱ्याचे ढीग आढळून येतात. अंतर्गत रस्त्याची देखील तीच स्थिती आहे. खुल्या प्लॉटमध्ये देखील कचरा टाकला जातो.


पाचही प्रभागात मोहीम सुरू
पाच झोननिहाय कंत्राटदारांच्या माध्यमातून शहराची स्वच्छता केली जाते. घंटागाडीद्वारे दैनंदिन कचरा संकलन करणे बंधनकारक आहे. गेल्या आठवड्यापासून शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. त्यात लोकसहभाग देखील महत्त्वाचा आहे. 
- डॉ. अजय जाधव. स्वच्छता विभाग प्रमख


कचरा दररोज उचलला जातो का?
घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलन केला जातो. तो ट्रक व कंटेनरच्या माध्यमातून सुकळी कंपोस्ट डेपोत नेऊन टाकला जातो. मात्र शहरातील अनेक भागात घंटागाड्या दररोज येत नसल्याची ओरड आहे. कुठे एक दिवसाआड तर दोन, तीन दिवसांनी घंटागाड्या येत असल्याची ओरड आहे.

Web Title: Three crores per month spent on cleaning; So who is responsible for this mess?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.