सिलिंडरचा भडका चिमुकल्यासह तिघे भाजले

By admin | Published: January 21, 2017 12:08 AM2017-01-21T00:08:58+5:302017-01-21T00:08:58+5:30

सिलिंडरमधील गॅसच्या भडक्याने एका कुटुंबातील तीन जण भाजले गेले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६.१० वाजताच्या सुमारास रवीनगर गल्ली क्रमांक ३ मधील रहिवासी भूषण मनोहर भोगे यांच्या घरात घडली.

Three of the cylinders were burnt with a pinch of water | सिलिंडरचा भडका चिमुकल्यासह तिघे भाजले

सिलिंडरचा भडका चिमुकल्यासह तिघे भाजले

Next

साहित्य, कार जळाली : रविनगर गल्ली क्रमांक ३ मधील घटना
अमरावती : सिलिंडरमधील गॅसच्या भडक्याने एका कुटुंबातील तीन जण भाजले गेले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६.१० वाजताच्या सुमारास रवीनगर गल्ली क्रमांक ३ मधील रहिवासी भूषण मनोहर भोगे यांच्या घरात घडली. शौनक भोगे (५), कांताबाई भोगे (७५) व भूषण यांची पत्नी अशी तिघेही या आगीत भाजली गेली. अग्निशमन दलाचे कर्मचारी वेळेवर पोहचल्याने आग नियंत्रणात येऊ शकली, त्यामुळे मोठी हानी टळली.
भूषण भोगे यांच्या घरातील सिलिंडरमधील गॅस शुक्रवारी संपला होता. त्यामुळे त्यांनी नवीन सिलिंडर बोलावले होते. ते सिलिंडर लावताना अचानक भडका उडाला. जखमी अवस्थेत तिघांनाही तत्काळ कुटुंबातील अन्य सदस्यांनी खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.
या घटनेची माहिती शेजारी राहणाऱ्या राजेंद्र प्रल्हाद कोल्हे यांनी अग्निशमन दलाला दिली. माहितीच्या आधारे फायरमन कल्याणकर, आडे, हजारे व वाहनचालक अहमद खाँ मिय्या खा यांनी पाण्याचा बंब घेऊन तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

तासाभरानंतर आगीवर नियंत्रण
अमरावती : भोगे कुटुंबातील सदस्य व काही नागरिकांनी सिलिंडरला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, गॅसच्या भडक्याने त्यांच्या घरातील फर्निचरसह बहुतांश घरगुती साहित्य जळून खाक झालेत. त्यामुळे त्यांनी सिलिंडर पुढे लोटत बाहेर नेले. मात्र, आगिच्या झळा त्यांच्या कारपर्यंत पोहोचल्या आणि कारही आगीच्या विळख्यात आली.
या आगित त्यांची कारसुध्दा जळुन खाक झाली. अग्निशमन दल पोहोचताच त्यांनी आगीवर पाण्याचा मारा करून त्यांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलीस ठाण्याचे पीएसआय पंकज ढोके यांनीही पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

महिनाभरातील
तिसरी घटना
शहरात महिनाभरात सिलिंडर भडक्याच्या तीन घटना घडल्या. यामध्ये संजीवनी कॉलनीत झालेल्या सिलिंडरच्या भडक्यात रीना ठाकरे नावाची विद्यार्थिनी दगावली, तर तिच्या मैत्रिणीवर अजूनही उपचार सुरु आहेत. दुसरी घटना काही दिवसांपूर्वीच राहुलनगरात घडली. सिलिंडर भडक्याने एका घरातील साहित्य जळून खाक झाले, तर तिसरी घटना शुक्रवारी रवीनगरात घडली. सिलिंडर भडक्याच्या या वाढत्या घटना लक्षात घेता नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.

Web Title: Three of the cylinders were burnt with a pinch of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.