तीन दिवस थंडीची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 10:57 PM2017-11-29T22:57:19+5:302017-11-29T22:58:38+5:30
गत आठवड्यातील ढगाळ वातावरण निवळल्याने थंडीचा कडाका वाढला आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : गत आठवड्यातील ढगाळ वातावरण निवळल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. मंगळवारी जिल्ह्यात ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने शहरासह ग्रामीण भागातही शेकोट्या पेटल्या आहेत. आता आणखी तीन दिवस थंडीची लाट वाढणार आहे. हा थंडीचा कडाका मात्र रबीसाठी पोषक असल्याने पेरण्यांची लगबग वाढली आहे
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यासह विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. आता मात्र, उत्तरेकडील वाºयाचा जोर वाढल्याने पूर्व राजस्थान, पूर्व उत्तरप्रदेश, उत्तर, पूर्व मध्यपेदेशात थंडीचा जोर वाढला आहे. त्याचा परिणामस्वरूप विदर्भासह ुजिल्ह्यातही थंडीच्या कडाक्यात वाढ झालीे. वातावरण बदलामुळे व बोचºया थंडीमुळे सर्दी,ताप, खोकला आदी आजारांमध्ये वाढ झाली आहे.
ही थंडी खरिपाच्या तुरीला पोषक आहे. तसेच रबी पिकांनादेखील दिलासा देणारी आहे. थंडीमध्ये गव्हाची उगवण चांगली होत असल्याने यंदा डिसेंबरपूर्वीच गव्हाच्या पेरण्यांना वेग आला आहे. सद्यस्थितीत १० हजार हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे. दर्यापूर, धामणगाव, अंजनगाव सुर्जी व चांदूर रेल्वे तालुक्यात मात्र गव्हाच्या पेरण्यांनी वेग घेतलेला नाही. याउलट हरभºयाची मात्र सरासरीच्या ७५ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. जिल्ह्यात करडई, मका, सूर्यफूल आदी पिकांचे क्षेत्र यंदा नाममात्र राहतील.