तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रात होणार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 11:25 AM2018-06-06T11:25:38+5:302018-06-06T11:25:48+5:30

Three days of monsoon to be shifted to Maharashtra | तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रात होणार दाखल

तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रात होणार दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देआंध्र किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येत्या ४८ तासांत मान्सूनचा पाऊस दक्षिण कोकणसह गोव्यात पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील २-३ दिवसांत तो महाराष्ट्रातील बऱ्याच भागात येण्यास परिस्थिती अनुकूल असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिला.
विदर्भात विखुरलेल्या स्वरुपात गडगडाटासह आणि वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. ६ व ७ जून रोजी विदर्भात विखुरलेल्या स्वरुपात हलका व मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ८ व ९ जून रोजी सर्वत्र पाऊस पडेल, अशी आशा वर्तविली जात आहे. याशिवाय ८ जून रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मान्सून महाराष्ट्राच्या उर्वरित भागात ९ ते ११ जूनपर्यंत पोहचण्यासाठी परिस्थिती अनुकूल होते आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पूर्व विदर्भावर, किनारी आंध्रप्रदेशवर कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) आहे. प. बंगाल आणि केरळ-कर्नाटक किनारपट्टीवर चक्राकार वारे वाहत आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र लवकरच तयार होत असल्याची माहिती बंड यांनी दिली.

Web Title: Three days of monsoon to be shifted to Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.