तीन दिवसांपासून विद्यार्थी अर्धपोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2017 12:24 AM2017-01-28T00:24:11+5:302017-01-28T00:24:11+5:30

येथील आदिवासी मुलाचे वसतिगृह क्रमांक २ मध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण दिल्या जात आहे व येथे घाणीचे साम्राज्य असल्याची तक्रार

For three days students have been half-way | तीन दिवसांपासून विद्यार्थी अर्धपोटी

तीन दिवसांपासून विद्यार्थी अर्धपोटी

Next

तक्रार : घाणीचे साम्राज्य, निकृष्ट जेवण
परतवाडा : येथील आदिवासी मुलाचे वसतिगृह क्रमांक २ मध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण दिल्या जात आहे व येथे घाणीचे साम्राज्य असल्याची तक्रार शुक्रवारी विद्यार्थ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली.
आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना अपुरे व निकृष्ट जेवण दिल्या जात असल्याच्या तक्रारी सर्वाधिक प्रमाणात आहे. येथील वसतिगृहाचे गृहपाल गणोरकर व भोजन कंत्राटदार यांच्या संगणमताने आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण देण्याची परंपरा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी शुक्रवारी निवेदनाद्वारे केला.
प्रजासत्ताक दिनाला देखील निकृष्ट जेवण देण्यात आले. ध्वजारोहणानंतर गृहपाल निघून गेले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी परत आले. नेहमीच विद्यार्थ्यांना सकाळी व संध्याकाळी उशीरा जेवण दिल्या जाते. त्यामुळे शाळा-महाविद्यालयात जाण्यास उशीर होतो. वसतिगृहात सर्वत्र घाण असून पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी आंघोळ करावी लागते. निर्वाह भत्ता वेळेवर दिल्या जात नाही. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: For three days students have been half-way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.