‘मालू इन्फ्रास्पेस’ला तीन दिवसांचा अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:40 AM2017-12-12T00:40:39+5:302017-12-12T00:41:03+5:30

गर्ल्स हायस्कूल चौक ते इर्विन चौक रस्त्यावरील दुभाजकांवर अनधिकृत युनिपोल उभारल्याप्रकरणी ‘मालू इन्फ्रास्पेस’ला तीन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

Three days ultimatum for 'Malu Infraspace' | ‘मालू इन्फ्रास्पेस’ला तीन दिवसांचा अल्टिमेटम

‘मालू इन्फ्रास्पेस’ला तीन दिवसांचा अल्टिमेटम

Next
ठळक मुद्देतुम्ही काढा, अन्यथा आम्ही पाडू : अनधिकृत युनिपोलची उभारणी

आॅनलाईन लोकमत
अमरावती : गर्ल्स हायस्कूल चौक ते इर्विन चौक रस्त्यावरील दुभाजकांवर अनधिकृत युनिपोल उभारल्याप्रकरणी ‘मालू इन्फ्रास्पेस’ला तीन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. तीन दिवसांच्या आत अनधिकृत जाहिरात लोखंडी पोल हटविण्यात यावे, अन्यथा महापालिका ते पोल हटवेल, अशी तंबी ‘मालू इन्फ्रास्पेस’ला देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी सोमवारी त्याबाबतच्या आदेशावर स्वाक्षरी केली.
‘मालू इन्फ्रास्पेसने उभारलेत अनधिकृत युनिपोल’ या वृत्तातून ‘लोकमत’ने दुभाजक विक्री आणि अनधिकृत फलक उभारणीचा मुद्दा लोकदरबारात मांडला होता. त्याची तात्काळ दखल घेत बाजार परवाना विभागाने नोटीस काढली. ती नोटीस सोमवारी दुपारच्या सुमारास ‘मालू इन्फ्रास्पेस’ला बजावण्यात आली. ‘गर्ल्स हायस्कूल ते इर्विन दुभाजक विकले’ या वृत्तातून ‘लोकमत’ने आयुक्त आणि मालू यांच्यात झालेला बेकायदेशीर करारनामा व या अनुषंगाने मालूंनी साधलेले आर्थिक हित चव्हाट्यावर आणले आहे. मार्गावरील दुभाजकाचे सौंदर्यीकरण व देखभाल-दुरुस्तीच्या नावावर मालूंनी महापालिकेकडून गर्ल्स हायस्कूल ते इर्विन दुभाजकाचे मालकत्व मिळविले. त्यासाठी घाईत करारनामा करण्यात आला. या करानाम्यावर महापालिका कुठलाही शिक्का नाही; मात्र आयुक्त हेमंत पवार यांची ‘पार्टी टू’ म्हणून स्वाक्षरी आहे. करारनाम्यानुसार गर्ल्स हायस्कूल ते इर्विन दुभाजकावर कुठेही, कोणत्याही जाहिराती लावण्याचे स्वातंत्र्य मालूंना देण्यात आले.

आयुक्तांच्या निर्देशान्वये ‘मालू इन्फ्रास्पेस’ला सोमवारी नोटीस बजावण्यात आली. तीन दिवसांच्या आत त्यांनी लोखंडी पोल हटवावेत, अन्यथा महापालिका हटवेल.
- सुनील पकडे, अधीक्षक, बाजार परवाना विभाग

Web Title: Three days ultimatum for 'Malu Infraspace'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.