चिखलदऱ्याच्या डोहात बुडून तिघांचा मृत्यू, दोघे बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:19 AM2021-08-17T04:19:24+5:302021-08-17T04:19:24+5:30

(फोटो पी १६ चिखलदरा) चिखलदरा : चिखलदरा पर्यटन स्थळावर फिरायला आलेल्या अकोला येथील दोन पर्यटकांचा जत्रा डोहात बुडून ...

Three drowned in mudslide, two rescued | चिखलदऱ्याच्या डोहात बुडून तिघांचा मृत्यू, दोघे बचावले

चिखलदऱ्याच्या डोहात बुडून तिघांचा मृत्यू, दोघे बचावले

Next

(फोटो पी १६ चिखलदरा)

चिखलदरा : चिखलदरा पर्यटन स्थळावर फिरायला आलेल्या अकोला येथील दोन पर्यटकांचा जत्रा डोहात बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी ३:३० वाजता ही घटना घडली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह सायंकाळी बाहेर काढले. मित्र बुडाल्याचे पाहून वाचविणाऱ्यांपैकी दोघांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसऱ्या एका घटनेत खटकाली येथील आंघोळीसाठी डोहात उतरलेल्या इसमाचा बुडून मृत्यू झाला.

शेख इकरम शेख हुसेन कुरेशी (२६) व शेख आजीम शेख सकुर (२७, अकोट फैल अकोला) अशी मृतांची नावे आहेत. एमएच ३० ए झेड ४६२६ व एमएच ०४ एफ एफ ४१२४ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने नऊ मित्र आले होते. सर्व मित्र जत्राडोह पॉइंट येथील कोसळणाऱ्या धबधब्याखाली डोहात आंघोळीसाठी उतरले. पैकी दोघे डोहातील खोल पाण्यात बुडाले. सहकारी मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण निष्फळ ठरला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढले. शवविच्छेदन करून रविवारी रात्री ते परिजनांना सोपिवण्यात आले. पुढील तपास ठाणेदार राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनात एएसआय सुरेश राठोड, सुधीर पोटे, आशिष वरघट, रितेश देशमुख सहकारी करीत आहे.

बॉक्स

महिनाभरात तीन मृत्यू

दोघे मित्र बुडाल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात नुमान खान अन्वर खान (२६) व मोहम्मद जावेद (रा. अकोला) यांची प्रकृती बिघडली. त्यांना चिखलदरा ग्रामीण रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले होते. याच पॉइंटवर महिनाभरात तिघांचा जीव गेला. यापूर्वी अकोट तालुक्यातील हिवरखेड येथील युवक बुडाला होता.

बॉक्स

खटकाली डोहात एकाचा मृत्यू

दुसऱ्या एका घटनेत चिखलदरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पोपटखेडा खटकाली मार्गावरील पीर बाबा नदीच्या डोहात एका इसमाचा बुडून मृत्यू झाला. हरीश जानराव काळमेघ (३८, रा. चौसाळा, तालुका अंजनगाव) असे मृताचे नाव आहे. शनिवारी आंघोळीसाठी डोहात उतरले असता बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह रविवारी काढण्यात आला.

Web Title: Three drowned in mudslide, two rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.